अंतराळ संस्था नासाच्या (National Aeronautics and Space Administration) इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अंतराळासंबधीत गोष्टींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. शिवाय हे फोटो किंवा व्हिडीओ असे असतात जे आपणाला सहसा पाहता शक्य नसतं. मात्र ते नासाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपणला सहज पाहता येतात. नुकतेच नासाने चंद्राचा असा एक फोटो शेअर केला आहे जो पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल.
NASA त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अंतराळाशी संबधीत फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना त्याच्याशी संबंधित माहितीही देत असतात. अशातच आता नासाने शनी ग्रहाचा आणि चंद्राचा सुंदर असा फोटो शेअर केला आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर शनी ग्रहाचा आणि चंद्राचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
फोटोत शनी ग्रहाशेजारी दिसतोय चंद्र –
व्हायरल फोटोमध्ये शनी ग्रहाचा एक भाग, त्याचे वलय आणि काही अंतरावर चंद्र दिसत आहे. हा फोटो कैसिनी अंतराळयानाने अंदाजे ९ लाख २७ हजार किलोमीटकवरून काढला होता. कैसिनी अंतराळयानाने वायमंडल, चुंबकीय क्षेत्र, चंद्र आणि वलयांचा अभ्यास करताना हा फोटो काढला असल्याचं सांगितलं जात आहे. नासाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये या फोटोची माहिती दिली आहे. NASA ने लिहिलं आहे की, शनीच्या रिंग एका कोनात दिसतात, जे ग्रहाच्या पिवळ्या पृष्ठभागावर एक पातळ रेषा तयार करतात, जी वरच्या बाजूला उजवीकडे अंतराळाच्या काळेपणाकडे जाते. रिंगच्या खाली, चंद्र मिमास ग्रहाच्या जवळ एक लहान बिंदूसारखा दिसत आहे.
नासाने शनिचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यापासून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. तर या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “रिंग्ज खूप पातळ दिसत आहेत.” तर दुसऱ्याने लिहिलं आहे, “व्वा! शनिदेवाचे अतिशय सुंदर चित्र.” तर तिसर्याने नेटकऱ्याने, “हे खरंच खूप सुंदर आहे! फोटो आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.”