फेसबुक, व्हॉट्स अप, मेल, ट्विटर यांसारख्या ठिकाणी ब-याचदा काही लिंक्स येतात. या लिंक्सवर क्लिक न करण्याच्या सूचना अनेकदा दिल्या जातात. या लिंक्सवर क्लिक केल्याने कधी अकाउंट हॅक होणे, त्यातील फोटांचा गैरवापर करणे किंवा उपकरणामध्ये व्हायरस जाण्याचे धोके असतात. काही जणांना याचा प्रत्यक्ष अनुभव आलाही असतो. या लिंक्स ओपन केल्यामुळे मोबईल फोन, लॅपटॉप, कॅम्प्युटरदेखील स्लो झाल्याचा वाईट अनुभव देखील गाठीशी असतो. असे असताना आजही कोण्या अनोळखी व्यक्तींकडून अशा लिंक्स आल्या की त्या ओपन केल्याशिवाय अनेकांना राहवत नाही.
त्यामुळे धोके असतानाही अशा लिंक्स ओपन करण्यामागची युजर्सशी मानसिकता काय असते याचा अभ्यास करण्यात आला. जर्मनीतल्या एका विद्यापीठाने याचा अभ्यास केला. यावर संशोधन करण्यासाठी विद्यापीठाने जवळपास १७०० मुलांना खोट्या नावाने किंवा खोटे अकाउंट बनवून त्यांच्या फेसबुक आणि जीमेलवर काही लिंक्स पाठवल्या. या लिंक्स धोकादायक असतील याची कल्पना असूनही अनेकांनी त्या उघडून पाहिल्या. याबद्दल मुलांना विचारले असता या लिंक्स धोकादायक असू शकतात याची कल्पना ७८ टक्के मुलांना होती अशी कबुलीही त्यांनी दिली. याआधारे या विद्यापीठाने एक निष्कर्ष समोर आणून यामागचे कारण उलगडले. हा धोका स्वीकारण्याचे खरे कारण म्हणजे युजर्सच्या मनात असलेली ‘उत्सुकता’ होय. या लिंक्स पाठवणारी व्यक्ती कोण आहे, ती कुठे राहते, ती कशी दिसते अशा अनेक प्रकारच्या उत्सुकता युजर्सच्या मनात तयार होतात आणि या उत्सुकतेपोटी निर्माण झालेल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक जण धोका स्वीकारून या लिंक्स ओपन करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा