आजकाल सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांपासून मोठमोठे उद्योगपतीही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर दररोज हजारो पोस्ट व्हायरल होत असतात, यातील काही मजेशीर असतात, तर काही आपणाला विचार करायला लावणाऱ्या असतात. तर काही पोस्ट या मजेशीर आणि आपणाला योग्य तो धडा शिकवणाऱ्या असतात. सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. जी प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्वीटरवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पैसा कमावण्यासाठी कशावर फोकस करावा लागतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक व्यक्तीला वाढत्या वयाबरोबर अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. शिवाय जबाबदारी अंगावर आली की आयुष्यात पैसा खूप महत्वाचा असल्याची जाणीव होते. कारण कोणतीही गोष्ट करण्यासाठी खिशात पैसा असणं गरजेचं आहे. मग मुलांचं शिक्षण असो वा घरच्यांचा दवाखाना किंवा घरातील एखादं लग्न, काहीही करायचं असेल तर पैसा गरजेचा असतो. त्यामुळे आजकाल सोशल मीडियावरदेखील पैशाशी संबंधित अनेक मजेशीर मिम व्हायरल होतात, ज्यामध्ये पैसा किती महत्वाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो.
तर अनेकांना श्रीमंत लोक पैशाचा वापर कसा करतात आणि ते पैसा कसा कमावतात? हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. अशातच आता श्रीमंत लोकं आयुष्यात नेमके कोणत्या गोष्टीवर फोकस करतात हे सांगण्यासाठी हर्ष गोयंका यांनी एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. जो वाचल्यानंतर तुम्हालादेखील आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे समजेल.
हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, मी माझ्या श्रीमंत मित्राला विचारलं, “आयुष्यात काय पाहिजे?” त्याने उत्तर दिलं, “पैसा.” त्यानंतर मी त्याला म्हटलं, “पैसा बाजूला ठेव आणि आता सांग काय पाहिजे?” त्यावर त्याने उत्तर दिले “बाजूला ठेवलेला पैसा.” यानंतर त्यांनी खाली लिहिलं आहे यातून धडा काय घ्याल तर पैशावर फोकस करा.
गोयंका यांनी ही पोस्ट शेअर करताच अनेकांना ती आवडल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “मी पण हेच उत्तर दिलं असतं.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “हे खरं आहे आयुष्यात पैसा खूप महत्वाचा आहे.” तर अनेकांनी बरोबर उत्तर असल्याचंही म्हटलं आहे. आतापर्यंत ही पोस्ट ५३ हजारांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. तर हजारो लोकांनी ती लाईक केली आहे.