भारत चंद्रावर पोहोचला आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला आहे. त्यामुळे या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण देशातील लोकांमध्ये उत्साह दिसून आला. इस्रोच्या शास्त्रज्ञांवर देशासह जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला, त्याचवेळी आपला शेजारी देश पाकिस्तानमध्ये इस्रोच्या या यशाची जोरदार चर्चा सुरू आहे. चांद्रयानच्या यशाचा उल्लेख करताना पाकिस्तानातील सामान्य नागरिकांसह न्यूज अँकरही त्यांच्या देशावर टीका करताना दिसत आहेत.
पाकिस्तमधील अँकरचा व्हिडिओ व्हायरल
अशातच आता पाकिस्तानातील एका महिला अँकरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पाकिस्तान सरकारवर टीका करताना दिसत आहे. ती म्हणते की, भारत चंद्रावर पोहोचला आहे पण आम्हीही कोणाच्या मागे नाही. आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्याला शत्रूपुढे झुकू दिलेले नाही. भारत चंद्रावर पोहोचला म्हणून काय, आपण आधीच आकाशात आहोत. आपल्या देशात महागाई, वीजबिल, गॅसचे दर, पेट्रोल, डिझेल, रॉकेलचे दर गगणाला भिडले आहेत.
हेही पाहा- दारूच्या नशेत महिलेचे पोलिसांशी गैरवर्तन, शिवीगाळ आणि झटापट करतानाचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानातील महागाईचा संदर्भ देत अँकरने म्हणते की, आम्ही आधीच आकाशात आहोत, त्यामुळेच पाकिस्तानी लोक म्हणत आहेत की, भारत चंद्रावर पोहोचला तर आम्ही स्वर्गात जाऊ. या पाकिस्तानी अँकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच. अनेक लोकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
एका ट्विटर युजरने लिहिलं, “पाकिस्तानला आणखी किती वरती जायचे आहे, सर्व काही आकाशात आणि लोक जमिनीवरआहेत.” अश्विनी कुमार यांनी लिहिलं, “पाक मधील मीडिया कसलाही असो, किमान तिथल्या सरकारला प्रश्न तरी विचारत आहेत.”तर आणखी एकाने लिहिलं, “निदान ती खरे बोलत आहे. आपली माणसं सीमा-सचिनमध्ये अडकली आहेत. त्यांना ना महागाई दिसते ना बेरोजगारी.”