Shocking video: चांगल्या चांगल्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये जेवायला जायला कोणाला नाही आवडत? पण तुमच्या आठवडत्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये अस्वस्छता आणि घाणेरडेपणा असेल तर…नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किळसवाण आणि संतापजनक कृत्य ऐकून तुमचाही राग अनावर होईल. नेकदा हॉटेलमध्ये जेवण ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला विनेगर कांदा, मिरची आणि लोणचं वगैरे अशा गोष्टी दिल्या जातात. तुम्ही मागवलेला पदार्थ टेबलावर येईपर्यंत काही तरी टाईमपास म्हणून तुम्हाला हे खायला दिलं जातं. अर्थात कांदा किंवा लोणचं वगैरे कोणी फारसं खात नाही. त्यामुळे ते पदार्थ तसेच राहतात. पण तुम्ही उष्टे केलेल्या या कांद्यांचं पुढे काय होतं हे तुम्हाला माहित आहे का? जर तुम्हाला वाटत असेल की ते पदार्थ फेकून दिले जातात. तर हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल.
हॉटेलमध्ये आपल्याला माहितीये टेबलवर आधीपासूनच कांदा लिंबू आणि मिठ असतं. जेवण आल्यावर आपण ते घेतो. कितीही असलं तरी कांदा लिंबू हे काही सर्व संपत नाही त्यामुळे उष्ट तसंच असतं. पण तुम्हाला माहितीये का हा उष्ट्या कांदा लिंबू फेकून दिला जात नाही तर तोच दुसऱ्या ग्राहकाला दिला जातोय.
हा व्हिडीओ foodsafetywar या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ हैद्राबादमधील ‘अमृतसर हवेली’ या हॉटेलमधील आहे. या हॉटेलमध्ये एका ग्राहकाला देण्यात आलेला कांदा आणि लोणचं पुन्हा एकदा रिसायकल केलं जातेय. म्हणजे त्यांनी उष्टावलेलं लोणचं फेकून देण्याऐवजी पुन्हा नव्या ग्राहकांना दिलं जातेय. याचा किळसवाण्या प्रकाराचा जाबही ग्राहकानं हॉटेल कर्मचाऱ्याला विचारला मात्र तो उडवा उडवीची उत्तरं देताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.