Viral video: एक छोटासा डास काय करणार आहे असं आपण म्हणतो खरं पण त्याचवेळी हा छोटासा डास चावला तर काय होईल याचा अंदाजही आपल्याला असतोच. जगातील अनेक देशांमध्ये या डासांची दहशत आहे. भारतात तर आपल्या प्रत्येकाची संध्याकाळ डासांच्या दहशतीखालीच असते. डासांमुळे पसरणारे आजार भारतात अधिक आहे. मात्र हा एक मच्छर जेव्हा आपल्याला चावतो तेव्हा शरीरात नेमकं काय होतं? हे माहिती आहे का तुम्हाला..मलेरिया होतो म्हणजे नेमका कसा होतो? चला तर एका व्हिडीओमधून हे पाहू..
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक डास जेव्हा आपल्याला चावतो तेव्हा नेमकं तो काय करतो हे दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मलेरिया वाहक एका डासाचा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये मलेरियाचा डास चावल्यानंतर मलेरिया शरीरात कसा पसरतो ते दिसत आहे. डास त्वचेवर दंश करतो, यानंतर आपल्या शरीरातलं रक्त शोषू लागतो. त्याचवेळी तो त्याच्या डांकातून त्याची लाळ आपल्या रक्तात मिळसते. यामध्ये मलेरियाचे जंतूही आपल्या शरीरात जातात. हळूहळू ते रक्तासोबत संपूर्ण शरीरात पसरतात. यानंतर आपल्या शरीरात हे पसरतं आणि आपल्याला ताप येतो. मग टेस्ट केल्यावर कळतं की मलेरिया झाला आहे. त्यामुळे या छोट्याशा डासांना हलक्यात घेऊ नका काळजी घ्या.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: मध्यरात्री भेटायला आलेल्या बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडने चक्क कुलरमध्ये लपवलं; घरच्यांनी पकडलं अन्…
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @ScienceGuys_अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.