Snake Bite Effect: सापाचं विष हे जीवघेणं आणि भयंकर असत. त्यामुळे सापाला सगळीचं लोक घाबरतात. सगळेच साप विषारी नसले, तरीदेखील अनेकांना त्यातील फरक कळत नसल्यामुळे सर्वच सापांना लोक घाबरून असतात. साप दिसला की दिसला अनेकजण तेथून पळ काढतात. काही लोकं तर साप दिसला की तो चावेल या भीतीने त्याला मारत सुटतात. सापाचं विष किती भयंकर असतं याची कल्पना अनेकांना असते. विषारी साप चावला की कशा प्रकारे माणसाचा मृत्यू होतो, अशा घटना देखील अनेकांनी पाहिलेल्या असतात. सध्या सोशल मिडियावर सापाच्या विषाचा माणसाच्या रक्तावर नेमका काय परिणाम होतो, हे दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. माणसाला विषारी साप चावला की साप का मरतो, हे या व्हिडिओतून दिसून येत आहे.
या व्हायरल व्हिडिओत एका व्यक्तीने सापाला पकडले आहे आणि तो त्याचे विष काढताना दिसत आहे. सापाला बघूनच तो विषारी असल्याचे समजत आहे. सापाचे तोंड या व्यक्तीने हाताने पकडले असून साप बाटलीच्या झाकणावर आपला फणा मारताना दिसतो. त्यांनंतर प्रयोगासाठी तयार कऱण्यात आलेल्या एका बाटलीत सापाचं विष काढलं जात.
( हे ही वाचा: बायको मागच्या सीटवर बसलेली असताना या पठ्ठ्याने बुलेटवर काय केलं पाहिलं का? Video होतोय Viral)
माणसाच्या रक्तावर करण्यात आला प्रयोग
माणसाच्या रक्तावर सापाच्या विषाचा होणारा प्रभाव जाणून घेण्यासाठी सापाचं साठवलेलं विष एका बाटलीत घेतलं जातं. दुसऱ्या एका ग्लासमध्ये माणसाचं रक्त घेतलं जातं. हे रक्त पातळ असल्याचं दिसतं. हे दाखवण्यासाठी व्हिडिओतील व्यक्ती ग्लासमध्ये घेतलेलं रक्त ढवळून दाखवतं आहे. त्यानंतर हा माणूस दुसऱ्या बाटलीमध्ये ठेवलेल्या सापाच्या विषाचा एक थेंब त्या रक्तात टाकतो.
येथे व्हिडिओ पाहा
( हे ही वाचा: ट्रेनच्या अप्पर सीटवरून खाली येण्यासाठी लहान बाळाची ‘निंजा टेक्निक’, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनो ‘हा’ Video एकदा बघाच)
रक्ताची गुठळी होते
व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रमाणे माणसाचे रक्त हे आधी पातळ दिसते. मात्र जेव्हा तो माणूस त्या रक्तात सापाच्या विषाचा एक थेंब टाकतो त्यानंतर त्या रक्ताचं स्वरुप हळूहळू बदलायला सुुरुवात होते. त्या माणसाने व्हिडिओत आधी दाखवल्याप्रमाणे अगोदर सहजरित्या ग्लासमध्ये फिरणारं हे पातळ रक्त हळूहळू घट्ट व्हायला लागत. त्यानंतर या रक्ताची गुठळी तयार होते. त्यानंतर व्हिडिओतील व्यक्ती हे रक्त ग्लासमधून दुसऱ्या भांड्यात ओतताना दिसतो मात्र त्यावेळी रक्त न पडता रक्ताची गुठळी खाली पडते.
व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय
विषारी सापाच्या विषाचा माणसाच्या रक्तावर नेमका काय परिणाम होतो आणि माणसाचा मृत्यू यामुळे नेमका का होतो, हे दाखवून देणारा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून अनेकांनी सापाची धास्ती घेतली आहे.