आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी चमकणारा तारा म्हणजेच सूर्य या वर्षी खूप सक्रिय दिसत आहे. हा त्याच्या सौरचक्राच्या शिखरावर आहे. गेल्या आठवड्यात याने तीन सोलर फ्लेअर्स खाली पाडले आहेत. तसंच १८ कोरोनल मास इंजेक्शन्स आणि एक जिओमैग्नेटिक वादळ निर्माण केले आहे. मात्र नेहमीच असे होते असं नाही. अनेकवेळा असे देखील दिसून आलंय की आपल्या सूर्याच्या पृष्ठभागावरील सर्व डाग पूर्णपणे नाहीसे होतात आणि त्यानंतर सूर्य हा झोपलेला असल्याचं प्रतीत होतं.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) च्या संशोधकांनी सूर्यावरील क्रिया संपल्यावर काय होते याबद्दलची माहिती दिली आहे. तारा स्वतःचा विस्फोट होण्यासाठी पुन्हा ऊर्जा कशी मिळवतो आणि कशाप्रकारे विस्फोटानंतर ताऱ्याच्या धोकादायक ज्वाळा बाहेर नुकसान पोहोचवतात याबद्दलची माहिती दिली आहे.

( हे ही वाचा: अंतराळात शारीरिक संबंध शक्य नाही! मग अंतराळवीर गर्भधारणा करु शकतात यावर चर्चा का?)

या संशोधनाविषयीचा लेख रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या मासिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, तारा झोपलेला असला तरी त्याच्या ध्रुवीय ठिकाणी आणि ताऱ्याच्या आत सतत हालचाल होत असते. संशोधकांनी शोधून काढले आहे की सूर्याची अंतर्गत डायनॅमो यंत्रणा, जी आपल्या सौरमालेचे चक्र राखते, ताऱ्याच्या शांत कालावधीत क्वचितच कार्य करते.

सूर्य कधी झोपतो?

सूर्यावर अशी देखील वेळ आली आहे जेव्हा त्याची क्रिया सर्वात मंद झाली होती आणि त्यावेळी सूर्यावर एकही डाग नव्हता. हा काळ ग्रँड मिनिमम म्हणून ओळखला जातो. या दरम्यान सूर्यामध्ये सोलर रेडिएशन आणि पर्टिकुलेट आउटपुट कमी होते, जे ग्रँड मिनिमम कालावधीचे वैशिष्ट्य आहे. शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की १६४५ ते १७१५ दरम्यान सूर्यावर फारच कमी सूर्याचे डाग होते. हा एक स्वतंत्र कार्यक्रम नाही तर सूर्याच्या वयाचा एक टप्पा आहे. सूर्याचे वय ४.६ अब्ज वर्षे आहे.

Story img Loader