शोले (Sholay) हा असा एक सिनेमा आहे जो सिने रसिकांमध्ये आजही चर्चिला जातो. हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतला माईलस्टोन आहे. हा सिनेमा आजही लोकांच्या ऑलटाईम फेव्हरेट सिनेमांच्या यादीत आहे. या सिनेमातले प्रसंग, मारामारीचे प्रसंग, संवाद आजही लोकांच्या तोंडी आहेत. अशात सोशल मीडियावर या सिनेमाची पुन्हा चर्चा होते आहे. एवढंच नाही तर काही घडलं तर सोशल मीडियावर सर्वात वेगाने मीम्सही या सिनेमावरुन तयार होतात. अशात शोले का चर्चेत आहे जाणून घेऊ.

शोळे हा सिनेमा जर हॉलिवूडमध्ये तयार झाला असता तर काय झालं असतं? AI च्या म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ही बाब आता समोर आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर आला आहे. एका AI आर्टिस्टने शोलेच्या या पात्रांना हॉलिवूडच्या कलाकारांसह बदललं आहे. हॉलिवूडमध्ये हा सिनेमा तयार झाला असता तर? असं टायटल देण्यात आलं आहे.

What If Sholay Was Made In Hollywood
byu/ShadyKaran inbollywoodmemes

Reddit युजर u/Shadykaran नी हा व्हिडीओ पोस्ट करताना उपयोग केला. या व्हिडीओवर विविध कमेंट येत आहेत. रॉबर्ट डे निरो हा जय, अल पचिनो विरु, ज्युलिया रॉबर्ट्स बसंती, अँथनी हापकिन्स गब्बर सिंग, केव्हिन स्पेसी ठाकूर बलदेव सिंग अशी पात्र आपल्याला या व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर आता युझर्सच्या विविध कमेंट्स येत आहेत. काही जण म्हणत आहेत की शोले हा सिनेमा हॉलिवूडच्या सिनेमावरुन प्रेरित होता असंही म्हटलं आहे. तसंच विविध कमेंट या व्हिडीओवर येत आहेत.

Story img Loader