AI Image Of Friends Cast:AI च्या ‘मिड जर्नी’ सारख्या टूल्सचा वापर करून, कलाकाराने आतापर्यंतची सर्व उत्कृष्ट फोटो तयार केली आहेत. राजकारणी असो की सुपरस्टार, कलाकारांच्या कल्पकतेमुळे अनेक सुंदर फोटो चित्रे पाहायला मिळाली. आता AI आर्टिस्टने सिटकॉम ‘फ्रेंड्स’च्या (FRIENDS) सर्व पात्रांना भारतीय पांरपारिक पद्धतीचा हटके लूक दिला आहे, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जर FRIENDS भारतात शूट झाली असती तर?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय) कलाकाराच्या कल्पनेला पंख दिले आहेत यात शंका नाही. याचे नमुने इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसत आहेत. आता ‘फ्रेंड्स’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांची AI फोटो आता भारतीय तरुणांमध्ये व्हायरल होत आहेत. यापूर्वी ‘फ्रेंड्स’ मालिकेतील सर्व पात्रे जर लहान असते तर कसे दिसले असते या कल्पनेवर आधारित फोटो शेअर केले होते. आता जर हे पात्र भारतीय लग्नाच्या पेहरावात कसे दिसतील अशी कल्पना करून फोटो तयार करण्यात आले आहेत. आणि हे फोटो इतके सुंदर दिसत आहे की लोकांना विश्वास बसणार नाही की हे एआय टूलद्वारे तयार केलेले फोटो आहेत. ही पोस्ट इन्स्टाग्रामवर (ai.magine_) नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. यामध्ये फिबी, रिचेल आणि मोनिकाचा लूक यूजर्सला खूप आवडला आहे.

हेही वाचा – लग्नासाठी देशी जुगाड! ट्रॅक्टरला बांधली दोरी, नवरदेवाला घेतले खांद्यावर अन् नदी केली पार; पाहा Viral Video

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
legendary filmmaker shyam benegal
अग्रलेख: भारत भाष्य विधाता!
nitish kumar Rahul Gandhi fact check photo
बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?

भारतीय पेहरावात कसे दिसले असते ‘फ्रेंड्स’ मालिकेतील पात्र?

रेचेल ग्रीनची भूमिका साकारणारी जेनिफर ॲनिस्टन साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहेरिचेलचा फोटो पाहिल्यानंतर ती एक भारतीय स्त्री असल्यासारखी वाटते. रॉस गेलरची भूमिका साकारणारा डेव्हिड श्विमर भारतीय पेहरावातमध्ये खूपच वेगळा दिसत आहे. त्याने शेरवानी परिधान केली असून भारतीय नवरदेवाप्रमाणे दिसत आहे. मोनिका गेलरच्या पात्रात कोर्टनी कॉक्स भारतीय सुंदरीसारखी दिसते आहे. कोर्टनी कॉक्सचे सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. मॅथ्यू पेरी, जो चँडलर बिंगची भूमिका साकारली आहे जर तो भारतीय फ्रेंड्स मालिकेत असता तर तो असा दिसला असता का? चँडलरचा फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. फिबी बफेची भूमिका करणाऱ्या लिसा कुंद्रो इंडिया रॉकस्टार लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

हेही वाचा – कौतुकास्पद! रेल्वे स्टेशनवर नव्हती व्हिलचेअर, RPF अधिकाऱ्याने वृद्ध महिलेला थेट उचलून नेले कोचपर्यंत; पाहा Viral Video

भारतीय लग्नात कसे दिसले असते ‘फ्रेंड्स’ मालिकेतील पात्र?

कोर्टनी कॉक्सस लिसा कुंद्रो आणि जेनिफर ॲनिस्टन साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. फ्रेंड्स मालिकेत जोई ट्रिबियानीची भूमिका करणारा मॅट लेब्लँक कुर्त्यामध्ये अप्रतिम दिसतो. याशिवाय फ्रेंड्स सिरीमधील कपल रेचेल ग्रीन आणि रॉस गेलर, मोनिका गेलर आणि चँडलर बिंग , फिबी बफे आणि माइक हॅनिगन हे भारतीय नवरा-नवरीच्या पेहरावामध्ये फारच गोड दिसत आहे.

भारतात ‘फ्रेंड्स’ मालिकेची आहे क्रेझ

‘फ्रेंड्स’ मालिकेची भारतीय तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. सप्टेंबर १९९४ ते मे २००४ पर्यंत फ्रेंड्स मालिकेचे सुमारे १० सीझन टेलिकास्ट झाले होते

तुम्हाला ‘फ्रेंड्स’ मालिकेचे भारतीय पेहरावातील फोटो कसे वाटले?

Story img Loader