आयुष्याच्या मार्गदर्शनात आईचे स्थान अमूल्य असते. ज्या काळात आपण जगाच्या रंगमंचावर पदार्पण करतो, त्या काळात आई आपल्या जीवनातील पहिली शिक्षक असते. तिच्या शिकवणींमुळेच आपल्याला योग्य दिशा सापडते. आईची शिकवण म्हणजे केवळ शिक्षण किंवा ज्ञानाची बाब नाही, तर ती जीवनाचे मूल्य, नैतिकता, आदर्श, आणि सहानुभूती यांचाही समावेश करते. आईची शिकवण म्हणजे आयुष्यभराची शिदोरी असते, यावरच आधारीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये किर्तनकार महाराजांनी आईची शिकवण कशी आयुष्यात उपयोगी ठरते याचं उदाहरण दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल आईचं महत्त्व.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महाराज सांगत आहेत की, एक आई मुलाला म्हणतेय तू इंजिनियर झाला आहेस ना, महिना झाला घरातला नळ लिकेज आहे.पकड घे आणि तो नळ आधी दुरुस्त कर. यावर मुलगा नळ दुरुस्त करतो आणि आईला सांगतो बघ मी नळ दुरुस्त केला. त्यानंतर काही दिवसांनी त्याचा नोकरीसाठी इंटरव्ह्यू असतो. तो इंटरव्ह्यूला जातो मात्र याठिकाणी १०० उमेदवार आणि नोकरी एकच अशी परिस्थिती असते. एक एक करुन सगळे उमेदवार इंटरव्ह्यू देऊन येतात, यानंतर या तरुणाची वेळ येते. हा तरुण इंटरव्ह्यूला आतमध्ये जातो आणि समोर त्याला एक नळ सुरु असलेला दिसतो, तो नळ तरुण आधी बंद करतो मग इंटरव्ह्यूसाठी पुढे जातो. हे पाहून परीक्षक खूश होतात आणि तुझी नोकरी पक्की असं त्याला सांगतात. यावर तो गोंधळतो आणि विचारतो हे कसं? त्यावर परीक्षक उत्तर देतात की ९९ तरुण आले, गेले मात्र नळ बंद कुणीच केला नाही पण तू केलास. यावेळी या तरुणाच्या डोळ्यात पाणी येते आणि आईने दिलेल्या शिकवणीची त्याला आठवण होते. यानंतर तो त्याच्या डायरीमध्ये लिहतो, “घडाळ्याची टिक टिक टाईम मॅनेजमेंट शिकवते तर आईची कट कट लाइफ मॅनेजमेंट शिकवते.”

killademente
Carol Acosta Dies : रेस्टॉरंटमध्ये जेवताना घशात घास अडकला, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा कुटुंबियांसमोरच मृत्यू
Samsung Galaxy S25 Series Launch In India
Samsung Galaxy S25 : सॅमसंगचा पॉवरफूल स्मार्टफोन होणार…
Man Grabs Leopard By Tail
Video: गावकऱ्याची कमाल, पळणाऱ्या बिबट्याची शेपटी पकडून धरून ठेवलं अन् लोकांचा जीव वाचवला; व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Elephants go to the market dogs bark Elephant greets curious dog with angry stare charges towards it Hilarious viral video
“हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”असे म्हणतात, पण इथे तर उलटंच घडलं, Viral Video पाहून पोट धरून हसाल
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
Viral Video Shows Pet Dog Wants To Ride
‘मम्मी प्लिज मला चढू दे…’ जत्रेत राईडमध्ये बसण्यासाठी श्वानाचा हट्ट, मालकिणीने केला ‘असा’ पूर्ण; पाहा Viral Video
elephant and her baby viral video
अरेरे! पिल्लाला झोपेतून उठवणारी आई; कधी सोंड, तर कधी शेपटी ओढत प्रयत्न सुरू; Viral Video पाहून आवरणार नाही हसू
Rumeysa Gelgi explained why she flies on a stretcher
जगातील सर्वात उंच महिला कसा करते विमान प्रवास? Viral Video पाहून व्हाल थक्क

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: म्हणून ट्रक चालकांचा नाद करु नये; ट्रकच्या मागे लिहला खतरनाक मेसेज, वाचून सगळेच लांब जाऊ लागले

सोशल मीडियावर हा व्हिडीओ love_status_24 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आईवरचं प्रेम व्यक्त करत आहेत. एकानं म्हंटलंय, “शेवटी आई आई असते” तर आणखी एकानं “आईसारखा गुरु जगी नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

m

Story img Loader