साप म्हटलं तर भल्याभल्यांना भीती वाटते. पण याच विषारी सापांपासून वाईन तयार केली जाते हे सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. काही वाइन त्याच्या काही वैशिष्ट्यांमुळे खूप प्रसिद्ध होतात. रम, व्हिस्की, वोडका आणि वाईन इत्यादी दारूचे प्रकार आहेत. आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची दारू प्यायली असेल किंवा त्यांच्याबद्दल ऐकले असेल. पण तुम्ही कधी सापापासून बनवलेली वाईन प्यायली आहे का? कदाचित तुमचे उत्तर ‘नाही’ असे असेल. पण सध्या सोशल मीडियावर अशा दारूचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दारु बघूनच नशा चढते. मात्र ही वाईन पाहून भल्याभल्यांची नशा उतरली आहे.तुम्ही कितीही वाईन लव्हर असला तरीही ही वाईन बघूनच तुम्हाला घाम फुटेल.
सापासून तयार होणारी वाईन
चीनमध्ये स्नेक वाईन तयार केली जाते. सापापासून बनवलेली ही दारू चीनमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. जिवंत किंवा मृत साप बाटलीत ठेवून, त्यात दारू टाकून महिनोनमहिने आंबायला ठेवले जाते. कुष्ठरोग, जास्त घाम येणे, केस गळणे, कोरडी त्वचा आणि इतर अनेक आजारांवर या दारूने उपचार केले जातात, असे सांगितले जाते. पारंपारिक औषधांमध्ये ते टॉनिक म्हणून पाहिले जाते. चीन, जपान, कंबोडिया, कोरिया, लाओस, तैवान, व्हिएतनाम आणि थायलंडमध्ये ही दारू तुम्हाला रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवरही मिळेल.
पिणे सुरक्षित आहे का?
काही अभ्यासातून असेही दिसून आले आहे की स्नेक वाईनमध्ये वेदना कमी करणारे आणि जळजळ कमी करणारे गुणधर्म आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ते पिणे सुरक्षित आहे का? तर उत्तर ‘हो’ आहे. इथेनॉलचा वापर राइस वाईनमध्येही केला जातो, ज्यामुळे सापाचे विष नष्ट होते. मात्र, ते बनवण्यासाठी विषारी सापांचा वापर केला जात नाही. तरीही ही वाईन पूर्णपणे सुरक्षित नसल्याचा दावा केला आहे. व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता, कशाप्रकारे ही वाईन बरणीमध्ये पॅक केली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> प्रेयसीच्या तोंडात दूध ओतलं; नंतर प्रियकराने केले घृणास्पद कृत्य…VIDEO होतोय तुफान व्हायरल
स्नेक वाईनच्या अतिसेवनानं तरूणांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. प्रसंगी नपुंसकताही येऊ शकते. त्यामुळं चवीपुरती स्नेकवाईन घ्यायला हरकत नाही. स्नेकवाईन जास्त पिणं धोक्याचच आहे.