Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाल्यापासून लोक सतत जुन्या, नवीन विविध भाषांतील गाण्यांवर डान्स करताना दिसतात. त्यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व जण असतात. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक गरोदर महिला नृत्य करताना दिसत आहेत. ही महिला एका भोजपुरी गाण्यावर नाचत असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आई होणं हा एक सुखद क्षण समजला जातो. मूल जन्माला येणार ही बातमी कळल्यापासून ते नऊ महिन्यांपर्यंत गर्भवती स्त्री आपल्या गर्भातल्या जीवाला जीवापाड जपते. तसेच बाळ निरोगी जन्माला यावं यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला, पौष्टिक आहार, गर्भसंस्कार यांकडे काटेकोरपणे लक्ष देते. प्रसूतीकाळातही अनेक यातना सहज करते. सध्या अशाच एका आईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; पण यामध्ये ती चक्क एका गाण्यावर रील्स बनविताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भडक लाल रंगाची साडी नेसून गर्भवती महिला भरउन्हात भोजपुरी गाण्यावर नृत्य करीत आहे. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. त्याशिवाय तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर असे इतर अनेक व्हिडीओदेखील पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा: शक्ती आणि युक्तीचा खेळ! प्राण्याची शिकार करण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावला चित्ता अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @saumyapandey.03 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत ३१ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि पाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय, “तुम्ही प्लीज आराम करा. या दिवसांत तुम्हाला आरामाची गरज आहे.” तर दुसऱ्या युजरनं लिहिलेय, “ताई, तुमची मुलंदेखील नाचत नाचतच जन्माला येतील.” तर तिसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “देवा, रील्सच्या नादात लोक काय काय करतात.”

दरम्यान, यापूर्वीदेखील अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती प्रसूतीदरम्यान, श्रीकृष्णाचे भजन करीत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी तिचं कौतुक करीत होते.