Wedding Viral Video: आजकाल लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होतात. लग्नसोहळ्याची चकचकीत सर्वांनाच आकर्षित करते. तसेच, प्रत्येकजण त्यांच्या लग्नाचा खूप आनंद घेतो. लग्नाच्या फेऱ्यांच्या वेळी कधी कधी पंडितजी वर आणि वधूला त्यांच्या शब्दात गुंफताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नक्की काय आहे या व्हायरल व्हिडीओमध्ये?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पंडीतजी वराला एक विचित्र प्रश्न विचारतात. ते विचारतात की “या जगातील सर्वात मोथा कोणता नशा आहे.” यावर नवरदेव कोणाचा काहीही विचार न करता आपल्याच शैलीत उत्तर देतो की “जेवणाचा”. नवरदेवाच्या या उत्तरावर सगळे हसायला लागतात.
(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)
(हे ही वाचा: सात मिनिटांसाठी ‘हा’ युट्युबर बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! एलोन मस्कलाही टाकले मागे)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ इंटरनेटवर सर्वांना खळखळून हसवत आहे आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की या वराला जेवण आवडते आणि तो फूडी आहे. अशा परिस्थितीत त्यासाठी जेवण हे सर्वात मोठे व्यसन आहे. नेटिझन्स हा व्हिडीओ खूप लाइक आणि शेअर करत आहेत. यासोबतच कमेंट बॉक्सही मजेशीर प्रतिक्रियांनी भरलेला दिसत आहे.