Viral video: छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्या घेतल्या अभिमानाने अंगावर रोमांच उठतात. एक नवीन ऊर्जा निर्माण येते; पण ही ऊर्जा प्रत्येकामध्ये वेगवेगळी असते. म्हणजे काही लोकांमध्ये ही ऊर्जा कानात बाळी, मोठी दाढी, रुबाब, मिशांना पिळा, भगवे कपडे, झेंडा, टॅटू इ. स्वरूपातून व्यक्त झाल्याचे दिसते. तर, काही लोकांसाठी शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचं अनुशासन, त्यांचा स्वभाव, गनिमी कावा इ. उर्जेचं काम करतं. अशी अनेक तरुण मंडळी आहेत, की ज्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास हा माहीतच नाहीये. शिवाजी महाराज की जय म्हणण्यापलीकडे शिवाजी महाराज आपल्याला किती माहीत आहेत हे बघण्यासाठी एका तरुणानं मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह येथे काही लोकांना शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव विचारलं. यावेळी याचा धक्कादायक निकाल म्हणजे ९९ टक्के लोकांना शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव सांगताच आलं नाही. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आजचा तरुण गळ्यात माळा घालून, कपाळावर चंद्रकोर लावतो. भगवे कपडे घालतो, हातात भगवे दोरे बांधतो, कानात बाळी घालतो, महाराजांसारखी दाढी कोरतो. गाडीवर ‘जय शिवराय’ असं लिहिलेलं दिसतं. स्टिकर काढलेला असतो. ज्या महाराजांनी किल्ले बांधले, त्यांनी कधीही स्वतःचं नाव कोणत्याही किल्ल्याला दिलं नाही; पण आजच्या तरुणाईला त्या गड-किल्ल्यांच्या भिंती नावं लिहून, त्या भरून टाकण्यात भूषणास्पद बाब वाटते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी महाराजांनी आणि मावळ्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हाताशी अपुरं संख्याबळ, अपुरी शस्त्रसामग्री, अपुरा पैसा असतानाही बलाढ्य असणाऱ्या मुघलांशी नेटानं लढत दिली आणि ती स्वराज्य मिळवून दाखवलं. मग आजचा तरुण नेमकं काय करतोय?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह येथे काही लोकांना शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव विचारत आहे; मात्र कुणालाच याचं उत्तर देता येत नाहीये. यावेळी तो शेवटी एका मराठी स्वच्छता कर्मचाऱ्याकडे जातो आणि त्याला शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव विचारतो. यावेळी ही मराठी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण नाव अगदी अचूकपणे सांगते. श्री छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले, असं तो पूर्ण नाव तो सांगतो. तेथे एवढ्या लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण नाव सांगणारी एकच व्यक्ती भेटली हे पाहून खरंच वाईट वाटतं. आज असे अनेक तरुण गावागावांत वा शहरांत आहेत, जे फेसबुकवर वा इतर समाजमाध्यमांवर स्वतःला शिवभक्त आणि शिवकन्या म्हणवून घेतात; पण आज असे किती तरुण आहेत, जे महाराजांच्या विचारांचे खरोखर अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
सोशल मीडियावर हा व्हिडीओ 59rancho_ranjeet नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.