‘बिबा’चे कुडते, ड्रेसेस हे महिला वर्गामध्ये सर्वाधिक पसंत केले जातात. कुडता किंवा पंजाबी ड्रेसेला मध्यंतरीच्या काळात फारसं फॅशनेबल मानलं जायचं नाही. वेस्टर्न आऊटफिटच्या ट्रेंडमध्ये पारंपरिक भारतीय पेहराव मागे पडला. पण या पेहरावाला फॅशन ट्रेंडमध्ये ‘बिबा’नं एक वेगळंच स्टेटस मिळवून दिलं असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. फॅशन शोमध्ये या ब्रँडचे कपडे आवर्जून दिसतात. पण तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? ‘बिबा’ हा पंजाबी शब्द आहे. याचा अर्थ होतो ‘पंजाबी सोनी कुडी’, ‘सुंदर मुलगी’ किंवा ‘अस्सल पंजाबी’.
Video : दुचाकी पार्क करताना ‘ही’ चूक तुम्ही करु नका
दिल्लीत राहाणाऱ्या मीना बिद्रा या गृहिणीने हा ब्रँड सुरू केला. फॅशन डिझायनिंगबद्दल फारसं माहिती नसलेल्या मीना बिद्रा यांनी पंजाबी ड्रेस तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. खरतर नव्वदच्या दशकात रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सुरू करणं हे धाडसाचं होतं, कारण त्यावेळी अनेकजणी टेलरकडून ड्रेस शिवून घ्यायच्या, पण मीना यांनी सुरू केलेला प्रयोग अल्वावधीतच यशस्वी झाला. १९८३ मध्ये बँकेकडून ८००० रुपयांचे कर्ज काढून त्यांनी या व्यवसायाची सुरूवात केली होती. आज त्यांचा व्यवसाय जवळपास ६०० कोटींच्या आसपास पोहोचला आहे. देशातील अनेक मोक्याच्या ठिकाणी ‘बिबा’चे शोरुम आहेत.