भारतात काही विशिष्ट शब्द हे कायमच वापरले जातात. अनेकदा आपण लोकांच्या तोंडून ऐकलं असेल की हा किती छपरी माणूस आहे किंवा कसे छपरी कपडे घातले आहेत हे आपण अनेकदा ऐकलं असेल. सोशल मीडियावर चित्रविचित्र व्हिडीओ तयार करणाऱ्यांनाही छपरी असं संबोधलं जातं. समाजाच्या नजरेत एखादी गोष्ट चांगली नाही त्यावेळी हा शब्द वापरला जातो. आदिपुरुष हा सिनेमा शुक्रवारी रिलिज झाला आहे आणि त्यानंतर छपरी हा शब्द ट्रेंडमध्ये आला आहे. सोशल मीडियावर तो सातत्याने लोक वापरत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छपरी या शब्दाचा नेमका अर्थ काय?

‘छपरी’ हा शब्द तुम्ही गुगलवर शोधला तर अर्बन डिक्शनरीचं पेज येईल. यामध्ये लिहिलं आहे की छपरी या शब्दाचा अर्थ एक बेजबाबदार व्यक्ती. ट्रेंडी हेअर कट आणि कपडे स्पेशल आणि आकर्षक दिसतो आहे असं त्याला वाटतं पण प्रत्यक्षात ते कपडे असे असतात की ज्याला छपरी असं संबोधलं जातं. अत्यंत भडक प्रकारचे कपडे किंवा भडक प्रकारचे शूज या सगळ्यालाही छपरी म्हटलं जातं. विचित्र हेअर स्टाईललाही अनेकदा छपरी म्हटलं जातं. Reddit या फोरमच्या माहितीनुसार या शब्दाचा अर्थ एखादी शिवी असू शकतो. मात्र हा शब्द सातत्याने सर्रास सोशल मीडियावर वापरला जातो आहे. ‘आज तक’ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

आदिपुरुषचे संवाद ‘छपरी’ असल्याची जोरदार टीका

आदिपुरुष हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. ६०० कोटींची गुंतवणूक करुन या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून लोक जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी फक्त सिनेमा वाईट आहे असं म्हटलं नाही तर यात छपरी भाषेचा उपयोग करण्यात आला आहे अशीही टीका केली. तसंच ट्विटरवर दिवसभर छपरी हा शब्द ट्रेंडमध्ये होता. सिनेमातल्या रावण, हनुमान, प्रभू राम यांच्या वेशभुषेची तसंच VFX ची खिल्लीही लोकांनी उडवली. सिनेमात दाखवण्यात आलेली रावणाची लंका सोन्याची नाही तर काळ्या दगडाची वाटते असंही लोकांनी मह्टलं आहे. तसंच सोशल मीडियावर लोक या सिनेमातले संवाद छपरी असल्याचं म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the meaning of chhapri word why the word is trending on social media after adipurush release scj