असं म्हणतात ‘Every Day Is a New Day’ किंवा येणारा प्रत्येक दिवस हा नवं काहीतरी घेऊन येतो. हल्ली काम, धावपळ, प्रवास यात आपण सगळेच एवढे व्यग्र झालो आहोत की आपल्यासाठी रोजचाच दिवस सारखा असतो. पण ऑफिस, काम, घर या कंटाळवाण्या आयुष्यातून काहीतरी वेगळं हवंच ना!  तुमच्यापैकी अनेक जण ट्विटरवर सक्रीय असतील. ट्विटर ट्रेंडवर जर तुम्ही नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की ट्विटवर काही हॅशटॅग हे नेहमीच ट्रेंड होत असतात. ते कधीच बदलत नाही #MondayMotivation, #TravelTuesday, #WisdomWednesday, #ThrowbackThursday हे हॅशटॅग त्यातलेच काही. अनुक्रमे सोमवार, मंगळवार, बुधवार या वाराला हे हॅशटॅग ट्रेंड होत असतात. हे हॅशटॅग म्हणजे काय? त्याचा अर्थ काय? याविषयी थोडक्यात

#MondayMotivation : शनिवार, रविवार असे दोन दिवस आराम केल्यानं अर्ध्याधिक लोकांना सोमवारी ऑफिसला जायचा मूडच नसतो. तेव्हा ऑफिसला जाणारे कर्मचारी कोणत्याही वाराचा एवढा दुस्वास करत नसतील तेवढा तो सोमवारचा करतात. पण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कंटाळा करण्यापेक्षा काहीतरी प्रेरणादायी विचार घेऊन कामाला सुरूवात करावी म्हणून #MondayMotivation हा हॅशटॅश वापरून अनेकजण सकारात्मक बातम्या, विचार, एखादी यशस्वी गाथा शेअर करतात. तेव्हा या हॅशटॅगवर तुम्ही क्लिक केलं तर अनेक प्रेरणायादी गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील.
#Tuesdaythought : मंगळवारी #Tuesdaythought किंवा #TravelTuesday हे हॅशटॅग सर्वाधिक ट्रेंड होतात. यादिवशी सुविचार किंवा प्रवासाचा फोटो शेअर करण्यात येतो.
#WisdomWednesday : वैचारिक खाद्य पुरवणारा हॅशटॅश म्हणजे WisdomWednesday असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. महान लोकांचे प्रोत्साहन देणारे विचार #WisdomWednesday हॅशटॅग वापरून बुधवारी शेअर केले जातात.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल
25 December Rashi Bhavishya In Marathi
२५ डिसेंबर पंचांग: चारचौघात कौतुक ते अचानक धनलाभ; पंचांगानुसार आज तुमची रास ठरेल का भाग्यवान? वाचा राशिभविष्य

Video : याला म्हणतात ‘खिलाडूवृत्ती’! पाहा शर्यत पूर्ण करण्यासाठी तिने काय केलं

#ThrowbackThursday : गुरूवारी वापरण्यात येणारा हा हॅशटॅग सेलिब्रिटींचा सर्वात आवडता हॅशटॅग होय. यादिवशी विस्मृतीत गेलेल्या आठवणींना उजाळा द्यायचा असतो. तेव्हा या हॅशटॅगवर तुम्ही क्लिक केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की यादिवशी अनेक जण आपले जुने फोटो, जुन्या आठवणी शेअर करतात.
#FridayFeeling : आठवडाभर एवढं काम असतं की पाच दिवस काम करणारे कर्मचारी शुक्रवारची जणू आतुरतेने वाट पाहत असतात. आठवड्याचा शेवटचा वार असल्याने कामातूनही थोडा उसंत मिळतो. तेव्हा शुक्रवारचा आनंद केवढा मोठा असतो हे वेगळं सांगायला नको. तेव्हा अनेक जण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा हॅशटॅग वापरतात.
#SocialSaturday : आठवडाभरात काम, प्रवास यातून होणारी दगदग इतकी असते की ‘सोशल लाईफ’पासून आपण काहीसे दुरावलो जातो. कुटुंबीय किंवा मित्र -मैत्रिणींसोबत वेळ घालवायलाही मिळत नाही, तेव्हा शनिवारी सारे एकत्र येतात, सोशल लाईफचा आनंद घेतात. तेव्हा शनिवारी #SocialSaturday हॅशटॅग वापरून अनेक जण आपापले ‘Social Saturday’ क्षण शेअर करतात.
#SundayFunday, #SelfieSunday : रविवार हा सगळ्यांचा आवडीचा वार आहे. हा दिवस म्हणजे मज्जा-मस्ती, आराम करण्याचा दिवस. तेव्हा दर रविवारी ट्विटवर #SundayFunday हा हॅशटॅश पाहायला मिळतो. हल्ली सेल्फीचं वेड आल्यापासून तर #SelfieSunday हा हॅशटॅग देखील ट्रेंड होताना दिसतो.

Story img Loader