Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण व्हिडीओ शेअर करतात. काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज प्रबोधन सुद्धा करतात. हल्ली किर्तन करणारे महाराज सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या किर्तनादरम्यानची छोटे छोटे प्रेरणादायी संदेशाचे क्लिप सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका महाराजांनी नवरा या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. या शब्दाचा अर्थ ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. (what is the meaning of Navara Maharaj told the meaning of husband watch viral video)
नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की तिला एक चांगला नवरा भेटावा. तिला समजून घेणारा, तिची काळजी करणारा आणि तिला मनापासून जपणारा पती भेटावा. नवरा या शब्दाचा अर्थ सांगताना महाराजांनी नवरा कसा असावा, याविषयी भाष्य केले आहे.
नवरा या शब्दाचा अर्थ काय? ( what is the meaning of Navara)
महाराज सांगतात, “नवरा या शब्दाचा अर्थ आहे – न म्हणजे नवऱ्या आधी मित्रत्वाच्या नात्याने समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा आणि रा म्हणजे रामासारखा एकनिष्ठ असणारा, तो म्हणजे नवरा. हा व्हिडीओ ऐकून कोणीही थक्क होईल. हा व्हिडीओ हजारो लोकांनी शेअर केला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
dhaynmandir या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खरं आहे” तर एका युजरने लिहिलेय, “सध्या नवरा म्हणजे रावण आहे” एका युजरने लिहिलेय,”बायकोचा काय अर्थ आहे?” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. महाराज लोकांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स लाइक्स वर्षाव करतात. समाज प्रबोधन करणारे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या लवकर पसंतीस उतरतात.