या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक जीवाला आपले पोट भरण्यासाठी अन्न ग्रहण करावे लागते. प्राणी-पक्षी शिकार करून आपले पोट भारत असतात तर मनुष्य प्राणी आपल्या स्वयंपाकघरात कित्तीतरी भाज्या, मांस, मसाले, यासांरखे विविध जिन्नस वापरून अतिशय स्वादिष्ट आणि विविध प्रकरचे पदार्थ बनवत असतो. अगदी आपल्या वरण भात, पिठलं, मोदक, जिलबी यांपासून ते थेट पाश्चिमात्य पिझ्झा, बर्गर, केक, मोमो इत्यादि, मोजता न येणारे पदार्थ आपण बनवत असतो.
मात्र अचानक एखादा भारतीय पदार्थ खाताना आपण याला इंग्रजी भाषेत काय बरं म्हणू शकतो? किंवा या पदार्थाचे इंग्रजीमध्ये काय बरं नाव असेल? असा भलताच प्रश्न आपल्याला पडतो. मुंबई म्हंटली कि आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिले, झटपट मिळणारा चमचमीत असा वडापाव येतो. अर्थात मुंबईच्या खाद्यपदार्थाची शानच आहे वडापाव. पण त्याला इंग्रजीत काय म्हणतात माहित आहे का? याचे उत्तर सोशल मीडियावरील तुफान व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका चिमुकलीने दिले आहे.
हेही वाचा : Optimus robot घालतोय कपड्यांच्या घड्या; पाहा एलॉन मस्कने शेअर केलेला ‘हा’ भन्नाट व्हिडीओ….
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर, @supper_sannidhi नावाच्या अकाउंट वरून एक अत्यंत मजेशीर असा व्हिडीओ शेअर झाला आहे. त्यामध्ये एक लहान मुलगी, ताटलीमध्ये वडापाव घेऊन खात असताना, कॅमेऱ्यामागून एक व्यक्ती [कदाचित वडील] तिला, “सानिधी तू काय खात आहेस?” असे इंग्रजीमध्ये विचारतो. त्यावर सानिधी वडापाव असे अगदी गोड आणि सुरात उत्तर देते. त्यावर तो व्यक्ती तिला “मग आपण या वडापावला इंग्लिशमध्ये काय म्हणणार?” असा प्रश्न करतो. त्यावर सानिधी काही सेकंद विचार करते आणि अगदी एखादी फॉरेनर व्यक्ती बोलेल, त्याप्रमाणे केवळ बोलण्याच्या शैलीत बदल करून “वाराफाव” असे नखरे करत वडापावचे इंग्रजीमध्ये नाव बोलून दाखवते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यांनतर, तो तुफान वायरल झाला. इतकेच नव्हे तर नेटकऱ्यांनी सानिधीच्या हुशारीचेदेखील खुप कौतुक केले आहे. काय आहेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा.
“ज्यांना ज्यांना हिचे इंग्लिश आवडले त्यांनी लाईक करा.” असे हसण्याच्या इमोजी टाकत एकाने लिहिले आहे. “खूप हसलो बाळा” असे कौतुक दुसऱ्याने केले आहे. तिसऱ्याने, “वडापावला इंग्रजीत ‘वाराफाव’ म्हणता, हे माहीतच नव्हतं आम्हाला” अशी गंमत केली आहे. चौथ्याने, “बापरे किती गोड. मी हा व्हिडीओ सारखा सारखा पाहत आहे.” असे म्हंटले. तर शेवटी पाचव्याने, फक्त व्हिडिओत म्हंटल्याप्रमाणे, “वराफाव” असे लिहिले आहे.
हेही वाचा : Recipe : ‘या’ पद्धतीने बनवलीत तर सिमला मिरचीसुद्धा सगळे आवडीने खातील; भाजीची रेसिपी, प्रमाण लिहून घ्या….
इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आत्तापर्यंत, २.२ मिलियन इतके व्ह्यूज आणि १०१K लाईक्स मिळाले आहे.