कधीही, कुणालाही खायला आवडणारा पदार्थ म्हणजे जिलेबी. पण तो फक्त भारतामध्येच नाही, तर सगळ्या जगानं जिलेबीला आणि जिलेबीनं सगळ्या जगाला आपलंसं केलंय. जिलेबीबद्दल काय सांगावे? समोर जिलेबी दिसताच, ती तोंडात कधी टाकतोय, असा मोह कुणाला आवरता येत नाही. सर्व मिठाई एका बाजूला आणि जिलेबी एका बाजूला. अशाप्रकारे जिलेबी स्वत:चे खास स्थान मिळवून आहे.
दिसायला एकदम गोलाकार, चवीला गोड व खुसखुशीत जिलेबी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. कुठे रबडी जिलेबीसोबत खाल्ली जाते, तर काही ठिकाणी ती दूध आणि दह्यासोबत खाल्ली जाते. हे सर्व पदार्थ तुम्ही नक्कीच खात असणार, परंतु याच जिलेबीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे कदाचित सर्वच लोकांना माहित असेल असे नाही. बऱ्याच लोकांना या पदार्थांची इंग्रजी नावे माहित नाहीत. चला तर जाणून घेऊया जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात.
जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात?
आपण या ठिकाणी तुम्हा-आम्हा सर्वांचा आवडता पदार्थ असलेल्या जिलेबीपासून सुरुवात करूया. तूप, तेल, मैदा, साखर अशा विविध घटकांपासून जिलेबी बनवली जाते. जिलेबी ही समारंभांच्या निमित्ताने अनेकांना खायला मिळते. लग्न सोहळ्यात जिलेबी खायला अनेकांची पहिली पसंती असते. पण या जिलेबीला इंग्रजी नाव काय आहे? अनेकांना चटकन उत्तर आठवत नसेल ना. तर आम्ही तुम्हाला सांगतो. जिलेबीला इंग्रजीत Rouded Sweet किंवा Funnel Cake म्हणतात. काही लोक जिलेबीला Sweetmeat किंवा Syrup Filled Ring असेदेखील म्हणतात.
हेही वाचा – अबब ! कोल्हापुरात वादळाने उडून गेला हत्ती, Video पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
जिलेबीला राज्यात वेगवेगळी नावे
दक्षिण भारतात ‘जिलेबी’ म्हणून ओळखला जाणार हा पदार्थ उत्तर भारतात ‘जलेबी’ म्हणून ओळखतात. बंगालमध्ये हे नाव बदलून ‘जिल्पी’ असं ठेवण्यात आलंय. गुजरातमध्ये दसरा आणि इतर सणांना फाफड्यासोबत जिलेबी खाण्याची परंपरा आहे. जिलेबीचे अनेक प्रकार वेगवेगळ्या राज्यांत प्रसिद्ध आहेत. इंदूरच्या बाजारपेठेत ‘मोठी जिलेबी’, बंगालमधील ‘चनार जिल्पी’, मध्य प्रदेशात ‘मावा जिलेबी’, हैद्राबादमधील ‘खोवा जिलेबी’, आंध्र प्रदेशात ‘इमरती’ किंवा ‘झांगिरी’ असं नाव जिलेबीचं आहे. मुघल सम्राट जहांगीरच्या नावावरून ते ठेवण्यात आलंय.