वडील आणि मुलांचे नाते जगातील सुंदर नात्यापैकी एक आहे. वडील आपल्या लेकरावर जीवापाड प्रेम करतो. त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतो. लेकराची हौस मौज भागवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करतो. वडील आपल्या लेकराला फुलाप्रमाणे जपावे लागते, प्रत्येक संकटातून त्याचे रक्षण करतो . प्रत्येक वडीलांना चांगला बाप होता येते असे नाही. अनेकदा पालक म्हणून लोक अशा चुका करतात ज्यामुळे ते आपल्या लेकराचा जीवही धोक्यात टाकतात. असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक वडीलांनी फक्त फोटोसाठी आपल्या मुलाचा जीव धोक्यात टाकला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये व्यक्ती लहान मुलाला हातात घेऊन सिंहाच्या पिंजार्यात उभा आहे. तो लहान चिमुकला सिंहाला पाहून अत्यंत घाबरलेला आहे आणि ढसाढसा रडत आहे तरी त्याचे वडील त्याला उचलून सिंहाच्या पाठीवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तेही फक्त फोटो काढण्यासाठी. सिंहांच्या अंगाला चिमुकल्याचा स्पर्श होताच सिंह चिडतो आणि मागे वळतो. सुदैवाने वडील आणि चिमुकला तेथून बचावतात. पण व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
व्हिडिओ नक्की कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. valley_to_desert_00 व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एक वडील आपल्या मुलावर सिंहाबरोबर फोटो काढण्यासाठी दबाव टाक आहे.”
व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीवर राग व्यक्त केला आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले की,
हे प्राणी आणि लहान मुलगा दोघांचा छळ आहे”
दुसरा म्हणाला की,”हे योग्य पालकत्व नाही”
तिसरा म्हणाला की, “किती वाईट वडील आहे”
चौथा म्हणाला की,”हा कसला बाप आहे रे”
पाचवा म्हणाला की,,”याच्या तोंडावर एक चप्पल मारा”
सहावा म्हणाला की,”किती तो मुर्खपणा”