Kaun Banega Crorepati Nareshi Mina: कौन बनेगा करोडपतीच्या १६ व्या पर्वात राजस्थानच्या नरेशी मीना या एक कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या. मात्र त्यांना एक कोटी रुपयांसाठीच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांनी ५० लाखांचे बक्षीस घेऊन खेळ तिथेच सोडला. २२ ऑगस्ट रोजी हा भाग प्रदर्शित झाला. आता इंटरनेटवर एक कोटीच्या या प्रश्नाची चर्चा होत आहे. तो कोणता प्रश्न होता आणि त्याचे उत्तर काय होते? ते पाहू.

एक कोटींचा प्रश्न काय होता?

भारतीय टेनिसपटू लीला रो दयाल यांनी विम्बलडन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये कुणाला हरवले? असा प्रश्न नरेशी मीना यांना विचारण्यात आला होता. यासाठी पर्याय देण्यात आले होते. अ) लोटी डोड (Lottie Dod), ब) ग्लॅडिस साउथवेल (Gladys Southwell), क) मे सटन (May Sutton) आणि ड) किटी गॉडफ्री (Kitty Godfree).

amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली

हे वाचा >> वडिलांची ‘ती’ अट आणि अमिताभ बच्चन यांनी जया यांच्याशी केलं लग्न, बिग बींनी स्वतःच केला खुलासा

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी नरेशी मीना यांच्याकडे एकही लाईफलाईन उरली नव्हती. त्यामुळे त्यांनी खेळ तिथेच थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन यांनी नरेशी यांना या चार पर्यायापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा दिली. नरेशी यांनी पर्याय ‘अ’ निवडला. मात्र ते चुकीचे उत्तर निघाले. एक कोटींच्या प्रश्नासाठी अचूक उत्तर होते पर्याय ‘ब’. टेनिसपटू लीला रो दयाल यांनी ग्लॅडिस साउथवेल यांचा पराभव करून एकेरी सामना जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला टेनिसपटू होण्याचा मान मिळविला होता.

कौन बनेगा करोडपतीचे १६ वे पर्व १२ ऑगस्ट पासून सुरू झाले आहे. नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेले कित्येक वर्ष अभिनेते अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या सूत्रसंचालनासाठी अनेकजण हा शो पाहतात.

हे ही वाचा >> “एक दिवस असा येईल…”, राजेश खन्नांनी अमिताभ बच्चन यांचा अपमान केल्यावर जया बच्चन यांनी केलेलं भाकीत

कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटपर्यंत पोहोचण्याचा प्रवास स्वप्नवत असल्याचे नरेश मीना यांनी ५० लाख जिंकल्यानंतर सांगतिले. अभिनेते अमिताभ बच्चन यांना इतक्या जवळून पाहणे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे मी वेगळ्याच जगात पोहोचल्याचे मला वाटत होते. मी त्यांच्याशी बोलू शकेल, असे मला कधीच वाटले नव्हते. मी माझ्यासाठी आयुष्यभर जतन करून ठेवणारी आठवण असेल.

स्पर्धेच्या दरम्यान नरेशी मीना यांनी त्यांच्या ब्रेन ट्युमर आजाराबाबत माहिती दिली. कौन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून जिंकलेल्या पैशातून या आजारावर उपचार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. माझ्या कुटुंबीयांनी आजवर खूप खर्च केला, दागिने तारण ठेवले, ते मला सोडवून घ्यायचे आहेत, असेही त्या म्हणाल्या.

Story img Loader