सोशल मीडियावर मंगळवारुपासून ‘what’s wrong with India’ हा हॅशटॅग तुफान ट्रेंड होत आहे. मगंळवारी सायंकाळपर्यंत २.५ लाखपेक्षा जास्त पोस्ट शेअर झाल्यानंतर हा हा हॅशटॅग चर्चेत आला. अनेक भारतीय या सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंडमध्ये सहभागी होत आहे. एवढं नव्हे तर MyGovIndia या पोर्टलने देखील या मोहिमेत सहभाग घेतला आहे. पण प्रश्न असा पडतो की, what’s wrong with India’ हा हॅशटॅग इतका ट्रेंड आहे? काय आहे हा what’s wrong with India’ हा हॅशटॅग? चला जाणून घेऊन या काय आहे सविस्तर प्रकरण..

what’s wrong with India’ हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड?
साधारण दहा दिवसांपूर्वी झारखंडमधील दुमका येथे एका स्पॅनिश पर्यटक महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी भारतात प्रवास करताना त्यांच्याबरोबर घडलेले वाईट अनुभव सांगितले.मात्र, काहींनी ही संधी साधून भारताच्या प्रतिमेवर चिखल फेक केली आणि अशा घटना देशात रोजच्याच घडत असल्याचा आरोप केला भारताला “जगातील बलात्काराची राजधानी” अशी खिल्ली उडवणाऱ्या अशा अनेक पोस्ट्स एका आठवड्यात शेअर करण्यात आल्या. . इतकेच नाही तर या पोस्ट्सनी सार्वजनिक स्वच्छता आणि संस्कृतीशी संबंधित रूढीवादी विचारांना प्रोत्साहन दिले. यातील अनेक पोस्ट्समध्ये ‘what’s wrong with India’ अशा शब्दात शेअर करण्यात आली होती. भारतातील काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दावा केला की, या पोस्ट्सला खूप जास्त महत्त्व दिले जात आहे आणि त्यासाठी X च्या अल्गोरिदमला दोष दिला आहे.

shivsena thackeray groups protest march in Kalyan over minor girls murder case
कल्याणमध्ये बालिका हत्याप्रकरणी ठाकरे गटाचा निषेध मोर्चा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
money laundering in immigration
ED On Canada Colleges : कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड
Himachal Pradesh manali heavy snowfall shocking video
मनालीच्या अटल टनलमध्ये जीवघेणी परिस्थिती; बर्फावरुन कार घसरल्या, एकमेकांवर आदळल्या अन्…; पाहा धडकी भरवणारे VIDEO
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
nitish kumar Rahul Gandhi fact check photo
बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?
What's wrong with India Story behind the viral trend

मंगळवारी अनेकांनी हा हॅशटॅग वापरून अनेक पोस्ट केल्या अनेक या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. सोशल मीडियावर काहींनी इतर देशांमध्येही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असेच अनुभव आल्याचे सांगितले आणि कॅप्शनमध्ये ‘what’s wrong with India’ हा हॅशटॅग वापरला आहे.

What's wrong with India Story behind the viral trend


X चे अल्गोरिदम ‘what’s wrong with India’ असा हॅशटॅग असलेल्या आणि भारतविरोधी आशय असलेल्यापोस्टचा प्रचार करत आहे हे सिद्ध करणे हा उद्देश होता.

३०० पेक्षा कमी फॉलोअर्स असलेल्या वापरकर्त्यांनी शेअर केलेल्या यापैकी काही पोस्ट्सना एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. कमेंट्स आणि लाईक्सचं प्रमाणही थक्क करणारं होतं.

What's wrong with India Story behind the viral trend

भारतीय एक्स वापरकर्त्यांनी पाश्चात्य देशांमध्ये उघडपणे शौचास आणि आंघोळ करणाऱ्या लोकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आणि ‘what’s wrong with India’ हा हॅशटॅगसग उपहासात्मकपणे शेअर केले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही मीम्स

फक्त नेटकरीच नव्हे तर MyGovIndia या सरकारच्या अधिकृत पोर्टलने देखील या ट्रेंडमध्ये सहभाग घेतला आहे.
‘what’s wrong with India’ या ट्रेंडला इतके महत्त्व कसे मिळाले हे माहित नसले तरी, भारतीय X समुदायाने निश्चितपणे हा ट्रेंड हायजॅक केला आणि तो त्यांच्या बाजूने वळवला आहे.

Story img Loader