ऑनलाईन कॅब बुक करून प्रवास करणे अनेकांना परडवणारे आणि सोयीचे वाटते. यामुळे तुमच्यापैकीदेखील अनेक जण ऑनलाईन कॅब बुक करत प्रवास करत असतील. परंतु, अशा कॅबमधून प्रवास करण्याचा प्रत्येकाचा अनुभव सेम नसतो. काहीवेळी चांगले वाईट अनुभव येत असतात. कॅब ड्रायव्हर आणि प्रवासी दोघांनाही काही वेळा वेगवेगळ्या अनुभवांचा सामना करावा लागतो. अशाचप्रकारे एका प्रवाशाला कॅबमधून प्रवास करताना वाईट अनुभवाचा सामना करावा लागला. कॅब ड्रायव्हरने प्रवाशाबरोबरच्या मित्राचा नंबर घेऊन त्याला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. या घटनेबाबत प्रवाश्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे, ज्यात युजर्सना या घटनेबाबत काय करता येईल असा प्रश्न विचारत मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. नेमकी ही घटना काय आहे आणि कॅब ड्रायव्हरने प्रवाशाच्या मित्राची कशाप्रकारे फसवणूक केली आहे? जाणून घेऊ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबंधित कॅब चालकाने प्रवाशाच्या मित्राचा नंबर घेत त्याला नंबर ब्लॉक करेन किंवा ५०० लोकांना नंबर शेअर करेन अशी धमकी दिली आहे. यामुळे घाबरलेल्या प्रवाशाने आता घडलेली घटना सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

संबंधित प्रवाशाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, मी ओला कॅब बुक करत चालकाला राइडचे पैसे पेटीएमद्वारे दिले होते. यादरम्यान जेव्हा आम्ही उतरण्यासाठी थांबलो, तेव्हा ओला कॅब ड्रायव्हरने माझ्याबरोबर असलेल्या मित्राचा नंबर मागितला. कारण त्याच्या मोबाईलचे नेटवर्क नीट काम करत नव्हते. यावेळी कसलाही विचार न करता त्याने नंबर दिला. यानंतर काही वेळाने तो कॅब ड्रायव्हर पैसे दिल्यानंतरही मित्राला कॉल करत पैसे आले नाही असे सांगतो आणि पैसे पाठवलेल्याचा एक झूम इन केलेला स्क्रीनशॉर्ट पाठवतो, (जो हिरव्या रंगाचा आहे- ज्यात पैसे पाठवलेले दिसतेय) यावरच तो थांबत नाही, तर पुढे तो मित्राला सतत कॉल करत धमकावत राहतो की, तुझा मोबाईल नंबर बंद करून टाकेन किंवा ५०० लोकांना पाठवेन. यावर तो युजर्सना आता काय केले पाहिजे, असा प्रश्न विचारत आहे. याची पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या पोस्टवर आता एका युजरने आपला अनुभव शेअर केला आहे. एका युजरने लिहिले की, जवळपास माझ्यासोबतही असेच घडले होते. ड्रायव्हरने माझ्या मित्राला जादा पैसे देण्यास सांगितले, ज्यावर मी त्याला असे का असे विचारले असता त्याने मला धमक्या देण्यास सुरुवात केली. मी एका दिवसात पाच हजार मिस्ड कॉल्सचा बॉट सेट केला आहे, जेणेकरून तो ओला किंवा ड्राइव्ह किंवा उबेरद्वारे पैसे कमवू शकत नाही. मी दररोज इनड्राइव्ह (indrive) वर तक्रारी केल्या आणि आठवड्याभराच्या रोजच्या तक्रारींनंतर कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले. यानंतर तो ड्रायव्हर कंपनीला (indrive) फोन करून रडायला लागला. यानंतर मला माझे पैसे परत मिळाले. अशाचप्रकारे इतर अनेकांनीही त्यांच्यासोबत घडलेल्या घटना कमेंट्सद्वारे शेअर केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp chat viral cab driver threaten passenger friend says now you see what i do sjr
Show comments