शहरात फसवणूक करणारे दिवसेंदिवस नवीन नवीन शक्कल लढवून लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटनासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर भामट्यांकडून पार्ट टाईम जॉब देण्याच्या नावाखाली व्हिडीओ लाईक करण्याचे टास्क देऊन फसवणूक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा टास्कमुळे अनेकांची बँक खाती रिकामी झाली.तंत्रज्ञानाची व्याप्ती जसजशी वाढत आहे, तसतशी हॅकर्स त्यांच्या कामाची पद्धतही बदलत आहेत. हॅकर्स आता युजर्सची माहिती चोरण्यासाठी आणि बँकिंग पासवर्ड फोडण्यासाठी नवीन पद्धत अवलंबत आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे, मात्र यावेळी स्कॅमरने एका व्यक्तीला धडा शिकवला आहे. या दोघांचे व्हॉट्सअप चॅट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल स्क्रिनशॉट्समध्ये तुम्ही पाहू शकता, घोटाळेबाजाने प्रथम महेशला व्हॉट्सअॅपवर मेसेज करत लिहिले आहे की, नमस्कार, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मला तुमच्या वेळेतील काही मिनिटे मिळतील का?” व्हॉट्सअॅपवरील हा मेसेज वाचल्यानंतरच महेशला हा संशय आला. यामुळे त्यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं. काहीही विचार न करता महेशनं लिहिले की, मला तुमच्याशी मैत्री करायची आहे. फ्रॉडने पुढे त्याचे नाव सांगितलं आणि काही मिनिटांत तो हजारो रुपये कसे कमवू शकतो हे सांगितले. महेश याला बळी पडला नाही आणि पुढे लिहिलं, मी इमानदार आहे. चांगल्या मित्रांचे नेहमी दोन चेहरे असतात असं तो म्हणाला. त्यावर स्कॅमरने उत्तर दिलं मित्र बनवण्यापेक्षा पैसे मिळवणं जास्त चांगलं आहे. हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा पोस्ट

हेही वाचा – लोकल ट्रेनमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला अन्… पाहा अंगावर काटा आणणारा Video

महेश नावाच्या ट्विटर युजरने त्यांच्या दोघांचे व्हॉट्सअॅप चॅट ट्विटरवर पोस्ट करत, स्कॅमरने मला चांगला धडा शिकवला असे म्हंटले आहे. नेटकरीही पोस्टखाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.