Viral News On Social Media: आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आता तुम्हीच पाहा की, इथे एक कर्मचारी आणि त्याच्या बॉसचे व्हॉट्सॲपचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बर्याच कर्मचार्यांसाठी सर्वांत कठीण गोष्ट म्हणजे त्यांच्या बॉस किंवा मॅनेजरकडून रजा मंजूर केली जाणे. कारण- कर्मचाऱ्याचा रजेचा अर्ज पाहताच अनेक बॉसना डोकेदुखी होते. जवळ-जवळ प्रत्येक कर्मचारी आपल्या बॉसला कंटाळलेला असतो. तुम्हीही ऑफीसमधील कामाचे ओझे वाढले, मानसिक ताण आला की शक्यतो वरिष्ठांना किंवा बॉसला सांगून सुट्टी घ्याल, सुट्टी मिळाली नाहीच तर आजारी असल्याचे सांगून दांडी माराल. दरम्यान सुट्टी मिळत नसलेल्या एका तरुणीने आपल्या बॉसकडे सुट्टी मागीतल्यानंतर काय झालं हे तुम्हीच पाहा. या कर्मचाऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅनेजर आणि तो अशा दोघांमधील चॅटिंग सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
प्रत्येक ऑफिसचे वर्क कल्चर वेगळे असते. कामाच्या पद्धतीशिवाय कामाचा ताणही तितकाच जास्त असतो. दरम्यान, रजा मागणे सोपे नसते. तुम्ही जरी रजा मागितली तरी काही वेळा तुमचा रजेचा अर्ज फेटाळला जातो. अशाच तरुणीने रजा नाहीतर अर्ध्या दिवसाची सुट्टी तरी द्या असी विनंती बॉसकडे केली आहे. मात्र महिलेनं आईच्या नावानं बॉसकडे अर्ध्या दिवसाची सुट्टी मागितली. अर्थात या सुट्टीसाठी बॉसनं नकार दिला. पण त्यानं हा नकार ज्या पद्धतीनं दिलाय ते पाहून खरंच तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही.
नक्की काय आहे चॅटमध्ये ?
महिलेला पूर्ण दिवसाची सुट्टी मिळत नसल्याने तिने अर्ध्या दिवसाची सुट्टी मागितली. त्यामुळे तिनं अत्यंत आदरानं बॉसला विनंती अर्ज केला. ती मेसेजमध्ये लिहते की, “बॉस प्लिज मला अर्ध्या दिवसाची सुट्टी द्या. खरं तर मला पूर्ण दिवसाची सुट्टी हवी होती. पण ऑफिसमध्ये काम खूप जास्त आहे. ते पाहाता पूर्ण सुट्टी घेणं योग्य ठरणार नाही हे मला माहिती आहे, त्यामुळे प्लीज मला अर्ध्या दिवसाची सुट्टी द्यावी ही विनंती.” अशा आशयाचा मेसेज तिनं बॉसला केला. यावर बॉसनं देखील तितक्याच गंमतीशीर पद्धतीनं तिला रिप्लाय दिला. तो म्हणाला, प्लीज, “मी रिक्वेस्ट करतोय, तू सुट्टी घेऊ नकोस. यावर ती कर्मचारी महिला म्हणाली, “जर मी सुट्टी घेऊन घरी गेली नाही तर आई माझा जीव घेईल.” दरम्यान यावर बॉसनं दिलेलं उत्तर वाचून ती पुढे वाद घालायला गेलीच नाही. तो म्हणाला, “तुम्ही २५ वर्षांच्या झाल्या आहात आणि या वयातही सुट्टी मिळवण्यासाठी तुम्हाला आईचं कार्ड वापरावं लागतेय.”
पाहा व्हायरल चॅट
हेही वाचा >> VIDEO: “आयुष्य एवढं सहज मिळतं का ?” रीलसाठी तरुणानं उंच इमारतीवरुन मारली उडी; पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का
दरम्यान या चॅटचे फोटो सोशल मीडियावर @crankyranterr नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.