फेसबुकच्या मालकीची इनस्क्रीप्टेड मेसेजिंग सेवा देणारा व्हॉट्सअॅप हा प्लॅटफॉर्म जेवढा सुरक्षित दाखवला जातोय तेवढा सुरक्षित नाहीय. आपल्या प्रायव्हसी फीचर्ससंदर्भात सतत चर्चेत असणाऱ्या व्हॉट्सअॅप या चॅटिंग अॅपसंदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये युझर्सचे खासगी आणि गोपनीय संदेश वाचण्यासाठी फेसबुकने जगभरामध्ये असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांपैकी हजारो कर्मचारी या देखरेखीच्या आणि रिव्ह्यूच्या कामासाठी ठेवले असून त्यासाठी त्यांना मोठी रक्कम वेतन स्वरुपात दिली जाते. वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचं आम्ही संरक्षण करतो आणि आमच्या व्हॉट्सअॅप या प्लॅटफॉर्मवरील सर्व मेसेज इन्स्क्रीप्टेड असतात असा दावा फेसबुककडून केला जातो. मात्र नवीन अहवालामध्ये या उलट खुलासे करण्यात आलेत. एवढेच नाही तर आता कंपनीने कथित स्वरुपामध्ये कंपनीने कायदेशीर यंत्रणांसोबत ही माहिती शेअर केल्याचाही दावा या अहवालात करण्यात आलाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा