WhatsApp हे एक ‘इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन’ आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे २० कोटींपेक्षा अधिक वापरकर्ते आहेत. त्यामुळे WhatsApp ला अधिकाअधिक युजरफ्रेंडली करण्यासाठी त्यामध्ये सतत काहीना काही नवीन फीचर्स जोडले जातात. सध्या व्हॉट्सअॅपमध्ये आणखीन एक नवीन फीचर आणले जात आहे. या फीचरचे नाव अद्याप ठरवलेले नाही. मात्र, यामुळे आपल्याला WhatsApp मेसेजचे स्क्रीनशॉट्स काढता येणार नाहीत. अगामी व्हॉट्सअॅप अपडेटमध्ये ही सुविधा मिळणार आहे. सुरवातीला हे फीचर केवळ प्रायोगीक तत्वावर राबवले जाणार आहे.
आपल्याला अनेकदा कोणीही उठ सूट WhatsApp ग्रुप्समध्ये अॅड करतो. आपले स्टेटस व प्रोफाईल पिच्चर यांचे स्क्रिनशॉट्स काढून त्यांना आपल्या नकळत व्हायरल केले जातात. तसेच अनेक खासगी संदेश, डॉक्युमेंट, फोटो व्हॉट्सअॅपवरून फॉरवर्ड केले जातात. हे डॉक्युमेंटही स्क्रीनशॉट्सच्या माध्यमातून लीक केले गेल्याचे प्रकार गेल्या काही वर्षात घडले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठीच व्हॉट्सअॅप क्रिएटिव्ह टीमने स्क्रीनशॉट्स रोखण्याचे फीचर तयार केले आहे.
When the Authentication feature will be available and you enable it, conversation screenshots are blocked (for you)
What do you think? I don’t like the idea and I don’t see the point.
If I authenticate my identity using my fingerprint, why conversation screenshots are blocked? https://t.co/wVFWyx2Ibb— WABetaInfo (@WABetaInfo) April 15, 2019
या फीचरबरोबरच ‘ऑडियो पिकर’ हे आणखीन एक नवीन फीचर वाढवले जाणार आहे. या फीचरच्या मदतीने ३० पेक्षा अधिक ऑडीओ फाईल्स एकाच वेळी आपण फॉरवर्ड करु शकतो. ज्या प्रमाणे आपण अनेक फोटो किंवा व्हिडीओ फॉरवर्ड करताना त्यांचा एक फोल्डर बनवतो आणि मग त्यांना एकाच वेळी फॉरवर्ड करतो. त्यामुळे आपला वेळ व श्रम वाचतात. अगदी त्याच प्रमाणे ऑडीओ पिकर हे अॅप्लिकेशन काम करणार आहे. सध्या ही सुविधा देणारे अनेक लहान लहान अॅप्लिकेशन अॅप्सस्टोअरवर उपलब्ध आहेत. वरील दोन्ही फीचर व्हॉट्सअॅपच्या २.१९.१०६ या अपडेटव्दारे आपल्या फोनमध्ये येतील.