दर महिन्याला वेगवेगळे फिचर्स घेऊन व्हॉट्सअॅप येत असतो. व्हॉट्सअॅप वापरणे अधिक सुलभ व्हावे यासाठी व्हॉट्सअॅपने आणखी एक फिचर आणले आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपचा पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे वापर युजर्सना करता येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमुळे युजर्सना एकाच वेळी अनेक कॉन्टॅक्ट नंबर आपल्या मित्र मैत्रिणींना सेंड करता येणार आहे.
पूर्वी अॅटॅचमेंट आयकॉनवर क्लिक केल्यावर शेअर कॉन्टॅक्टचा पर्याय होता. याचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधला एखादा नंबर फॉरवर्ड करता येत होता. पण समस्या अशी होती की एका वेळी फक्त एकच नंबर सेंड करता येत होता. पण आता नव्या फिचरमुळे ही समस्या दूर होणार आहे. तेव्हा युजर्स एकावेळी अनेक कॉन्टॅक्ट शेअर करू शकतात. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा नोकरदारांसाठी या फिचर्सचा जास्त चांगला फायदा होणार आहे. दुसरं म्हणजे अनेक मित्र मैत्रिणींनादेखील एकाच वेळी कॉन्टॅक्ट पाठवता येणार आहेत. तेव्हा याचा दुहेरी फायदा होणार आहे. अँड्राइडच्या बीटा २.१७. १२३ व्हर्जनवर हे फिचर उपलब्ध आहे. लवकरच हे इतर व्हर्जनवरही उपलब्ध होईल.