व्हॉट्स अॅप सर्वाधिक वापरण्यात भारतीय अव्वल आहेत. वेळोवेळी व्हॉट्स अॅपने वेगवेगळे फिचर्स देत आपल्या युजर्सना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कॉलिंगपासून ते इमेज पाठवण्याची मर्यादा वाढवण्यात असो किंवा नवनव्या इमोजी असोत. आता व्हॉट्स अॅपने आणखी एक फिचर आणले आहे ते म्हणजे ‘व्हॉट्स अॅप स्टेटस’.
VIDEO : अशी घडवली किम जाँग ऊनच्या सावत्र भावाची हत्या
वाचा : ८० टक्के भारतीय कर्मचारी बॉसपेक्षा जास्त काम करतात
अँड्रॉईड आणि विंडोज फोनवर व्हॉट्स अॅपचे हे नवं फिचर अपडेट झाले आहे. हे नवे फिचर वापरून युजर्स आपले आपले स्टेटस क्रिएट करू शकतात. यावर ते फोटो, व्हिडिओ, जीआयएफ फाईल्स शेअर करू शकतात. त्यावर तुम्ही कॅप्शनही लिहू शकता. विशेष म्हणजे २४ तासांनंतर हे स्टेटस निघून जाईल. त्यामुळे २४ तासांनंतर तुम्हाला पुन्हा एकदा स्टेटस अपडेट करावे लागेल. जर तुम्हाला एखाद्याचे स्टेटस आवडले तर तुम्ही त्याव्यक्तिला मेसेजही करू शकता. थोडक्यात इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट स्टोरी या फिचर्सच्या अगदी जवळ जाणारे हे फिचर आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपने काही वेगळं असं काही दिलं नाही, अशाही टीकाही होत आहेत. पण शेवटी व्हॉट्स अॅप ते व्हॉट्स अॅप. त्याचे युजर्स हे सर्वाधिक आहेत त्यामुळे व्हॉट्स अॅपचे हे फिचर युजर्सना तरी पहिल्या क्षणात पसंत पडलं आहे. पण या अपडेटमुळे तुम्हाला पूर्वीसारखे आता टेक्सच्या स्वरुपात स्टेटस ठेवता येणार नाही, त्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. तेव्हा तुम्हीही व्हॉट्स अॅपवरच्या जुन्या ‘available’, ‘DND’, ‘meeting’, अशा रटाळ स्टेटसला सोडचिठ्ठी द्या आणि नवं काहितरी ट्राय करा.