व्हाॅट्सअॅप नसेल तर आपलं काय होणार? रोज सकाळी GM, GM, ‘शुभ सकाळ’ सारखे प्रसन्न शब्दातले मेसेज पाठवत आपल्या दिवसाची सुरूवात कोण  करणार?  वाढदिवसाला शुभेच्छा देणं कित्ती कठीण होऊन जाईल. सगळ्यांना वरचेवर वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये अॅड करणारं पब्लिक पण हिरमुसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोक्स बाजूला ठेवले तर आपल्या सगळ्यांना पटेल की व्हाॅट्स्अॅप हा आपल्या सोशल मीडियाच्या वापरामधला एक जाम महत्त्वाचा भाग झालाय. ‘हॅपी फॅमिली’ पासून ‘टांगा पल्टी’चे सगळे सदस्य व्हाॅट्सअॅपवर पडीक असतात. तसंच बरेच धडाडीचे कार्यकर्ते आपल्या मोहिमा व्हाॅट्सअॅपवर आखत असतात. या अॅपवरचे मेसेजेस सुरक्षित असतात आणि कोणीही हॅकर ते वाचू शकत नाही असा व्हाॅट्सअॅपचा दावा असतो. पण याच दाव्याला अमेरिकेतल्या एका संशोधकाने चॅलेंज केलंय.

युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्नियामधल्या टोबियास बोल्टर या संशोधकाने असा दावा केलाय की व्हाॅट्स्अॅपचे मेसेजेस सुरक्षित नाहीत.

आपण आपल्या अॅपमध्ये ‘एंड टू एंड एन्क्रिप्शन’ वापरतो असं व्हाॅट्सअॅप म्हणतं. याचाच अर्थ एखाद्याने आपल्या सेलफोन  वरून पाठवलेला मेसेज दुसऱ्याच्या मोबाईलवर पोचेपर्यंत तो मेसेज कोणीही, अगदी व्हाॅट्सअॅपही हॅक करू शकत नाही. आपल्या अॅपमधल्या या एन्क्रिप्शनमुळे दोन व्यक्ती किंवा एखाद्या ग्रुपमधलं संभाषण गुप्तहेर संघटना किंवा सरकारं हॅक करू शकत नाहीत असं व्हाॅट्सअॅप म्हणतं.

पण या सुरक्षा प्रणालीमध्ये आपल्याला एक कमतरता आढळल्याचं टोबियास बोल्टर यांनी म्हटलंय. बोल्टर यांचं सध्या एन्क्रिप्शन आणि क्रिप्टोग्राफी या विषयांवर संशोधन सुरू आहे.

आपण जर आपल्या मित्राला एखादा मेसेज सेंड केला, तर तो मेसेज सीक्रेट ठेवण्यासाठी व्हाॅट्स्अॅप तो मेसेज एन्क्रिप्ट करतं. ज्यामुळे कोणालाही हा मेसेज हॅक करता येत नाही. पण जर आपल्या मित्राचा फोन बंद असेल किंवा इतर काही कारणांमुळे जर हा मेसेज डिलिव्हर झाला नाही तर या एन्क्रिप्शनमध्ये बदल होतो. नेमक्या याच वेळी हा मेसेज हॅक केला जाऊ शकतो असं बोल्टर यांचं म्हणणं आहे.

तेव्हा बाॅस, फाॅरवर्ड करताना जरा जपून. मेसेज भलतीकडेच जायचा !