WhatsApp Wedding Invitation Scam : हल्ली कुटुंबातील कार्यक्रमांचे आमंत्रण व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिले जाते. पूर्वी प्रत्येक नातेवाईकांच्या घरी लग्नपत्रिका देत लग्नाचे आमंत्रण दिले जायचे, पण आता लोक दूर प्रवास करण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आमंत्रण देणे पसंत करत आहेत. लग्नपत्रिकेची पीडीएफ तयार करून आपल्या दूरवरच्या मित्रांना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजद्वारे पाठवली जाते. यामुळे वेळेची आणि पैशांचीपण बचत होते. पण, याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी लोकांचे मोबाइल हॅक करण्याचा नवा स्कॅम शोधून काढला आहे, ज्यामुळे तुम्हालाही व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्या अनोळख्या मोबाइल नंबरवरून जर कोणती लग्नपत्रिका आली तर ती डाऊनलोड करू नका, अन्यथा तुमचा मोबाइल हॅक झालाच म्हणून समजा. पण, हॅकर्स लग्नपत्रिकेच्या माध्यमातून कशाप्रकारे तुमचा मोबाइल हॅक करतात जाणून घ्या.

‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’पासून रहा सावध; पोलिसांचा इशारा (WhatsApp Wedding Invite Scam)

हिमाचल प्रदेश पोलिस अधिकाऱ्यांनी ‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’बाबत सावधानतेचे इशारा दिला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, हॅकर्स लग्नपत्रिकेची पीडीएफ व्हॉट्सव्हॉट्सअ‍ॅपद्वारे लोकांना पाठवतात. यानंतर तुम्ही ती डाउनलोड करताच तुमचा मोबाइल हॅक होतो.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
swapan sashtra dream interpretation about money gold silver
स्वप्नात भरपूर पैसा, सोन्या-चांदीचे दागिने दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं स्वप्नशास्त्र
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
mercury transit in scorpio 2024
बुध ग्रहाची उलटी चाल, २६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना करेल श्रीमंत! नोकरी व्यवसायात मिळेल यश अन् बक्कळ पैसा

लग्नपत्रिकेची पीडीएफ तुमचा मोबाइल करेल हॅक

रिपोर्ट्सनुसार हॅकर्स या स्कॅमसाठी सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिकेची पीडीएफ पाठवतात, जी पाहताना पूर्णपणे खरोखर लग्नपत्रिका आहे अशीच दिसते. पण, तुम्ही लग्नपत्रिकेची apk फाईल डाउनलोड करताच त्यानंतर मालवेअर तुमच्या मोबाइलमध्ये प्रवेश करतो. अशाने सायबर गुन्हेगार पूर्णपणे तुमच्या मोबाइलमध्ये प्रवेश करतात आणि तुमचा मोबाइल डिव्हाइस हॅक करतात.

Whatsapp Wedding Invitation scam
वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम

यानंतर ते कोणत्याही गुन्हेगारी कृत्यासाठी तुमचा मोबाइल वापरू शकतात. तुमच्या मोबाइलचा संपूर्ण कंट्रोल हॅकरच्या हातात असतो. अशा परिस्थितीत ते तुमच्या मोबाइलवरून कोणालाही मेसेज पाठवू शकतात. मोबाइलमध्ये मालवेअर अॅक्टिव्ह असल्यामुळे ते तुमच्या मोबाइलमधील डेटाही चोरू शकतात. त्यांना तुमच्या मोबाइलवरील सर्व ॲप्स आणि फोल्डर्समध्ये प्रवेश करता येतो. हे हॅकर्स तुमच्या माहितीशिवाय तुमचे बँक अकाउंटदेखील रिकामे करू शकतात. (Fake Wedding Invitation Scam)

“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video

ही एक सावधगिरी तुमचा मोबाइल हॅकर्सपासून करेल सुरक्षित

हा स्कॅम एका अनोळखी मोबाइल नंबरवरून पाठवलेल्या व्हॉट्सअ‍ॅपप मेसेजने सुरू होतो, ज्यात लग्नपत्रिकेची पीडीएफ असते. अनोळख्या व्यक्तीने पाठवलेल्या कोणत्याही मेसेजमधील फाईल जरा विचारपूर्वक डाउनलोड करा. जर तुम्ही चुकून ती एपीके फाईल डाऊनलोड केली असेल आणि तुम्हाला मोबाइलमध्ये काही संशयास्पद वाटले तर लगेच पोलिसांत तक्रार करा. ऐन लग्नसराईत उघडकीस आलेल्या या स्कॅमनंतर लोकांनी थोडी खबरदारी बाळगा.

कारण लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी अनेकदा लोक आपल्या अनेक नातेवाईकांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करतात. अनेकदा आपल्याकडे काहींचे नंबर सेव्ह नसतात, अशावेळी त्या नंबरवरून आलेली लग्नपत्रिका डाऊनलोड करू नका, करायची असल्यास ती खरोखरच नातेवाईकांनी पाठवली आहे का याची खातरजमा करा.