व्हॉट्सअॅप युजर्सना हवे असलेले जुने व्हॉट्स अॅप स्टेटस फिचर हे पुढच्या आठड्यापासून परत येणार आहे. गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपने ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’ हे नवे फिचर आणले होते. खरं तर या फिचरला लोकांचा नकारात्मक प्रतिसाद जास्त लाभला होता. हे फिचर आल्यापासूनच काही तासांतच ते काढून टाकण्यासाठी युजर्सने मागणी केली होती. त्यानंतर व्हॉट्स अॅपने जुने स्टेटस फिचर लवकरच परत आणणार असल्याचे सांगितले, पण आता पुढच्या आठवड्यापासूनच हे जुने फिचर परत येणार आहे. सुरूवातील अँड्राईड फोनवर हे जुने फिचर उपलब्ध होणार आहे नंतर आयफोनवर हे फिचर उपलब्ध होईल. त्यामुळे पूर्वीसारखेच व्हॉट्सअॅप युजर ‘Available’, ‘Busy’ यासारखे स्टेटस ठेवू शकतात. पूर्वीसारखे आपले स्टेटस ते कस्टमाईजही करू शकतात. जुन्या स्टेटसाठी एक वेगळा आयकॉन दिला जाणार आहे. पण याचबरोबर नवे फिचरही तसेच राहणार आहे. या फिचरचा वापर करून युजर्स पूर्वीसारखे फोटो, व्हिडिओ, जीआयएफ इमेज शेअर करू शकतात.

अनेकांचे फोटो आणि स्टेटस एकमेकांना अनुसरून असायचे. ‘Available’, ‘Busy’ बरोबरच आवडत्या कवितेतल्या गाण्यांच्या ओळ्या देखील ठेवता यायचे त्यामुळे अनेकांची इमोशनल अटॅचमेंट त्याला जोडली होती. पण नव्या व्हॉट्स अॅप स्टेटसला मात्र नकारात्मक प्रतिक्रियाच आल्या. हे फिचर व्हॉट्सअॅपवर नवे असले तरी इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटसारख्या अॅपवर हे फिचर आधीपासूनच होते. त्यामुळे व्हॉट्सअॅपने या फिचरची कॉपी केल्याचेही म्हटले जात होते. त्यामुळे जुने स्टेटस परत आणण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पुढच्या आठड्यापासून युजर्स जुने व्हाट्स अॅप स्टेटस ठेवू शकतात.

व्हॉट्सअॅप स्टेटसच्या फिचरबरोबर आणखी दोन फिचर्स आणण्याच्या बेतात व्हॉट्सअॅप आहे. हे दोन फिचर्स आतापर्यंत फक्त अॅपलसाठी एक्सक्यूझीव्ह होते. आतापर्यंत अँड्राईडवर व्हॉट्सअॅप व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंगसाठी एकच बटण होते. त्या चिन्हावर क्लिक केले की व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉलचा पर्याय निवडता येतो. पण आता या दोन्ही पर्यायासाठी दोन वेगवेगळे आयकॉन असणार आहेत. वर उजव्या बाजूला हा पर्याय उपलब्ध असणार आहे.तर अटॅचमेंट आयकॉनची जागाही बदलणार आहे. फाईल अटॅचमेंटचा पर्याय कॉलिंग आयकॉनच्या नंतर होता. आता हा पर्याय टायपिंग बॉक्सच्या बाजूला येणार आहे. म्हणजे जिथे कॅमेराचा आयकॉन आहे त्याच्या बाजूला हा पर्याय देखील येणार आहे. कंपनीने हा बॉटम बार रिडिझाइन केला आहे, त्यामुळे तोही वेगळ्या स्वरूपात पाहायाला मिळणार आहे.

Story img Loader