गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅपने ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’ हे नवे फिचर आणले होते. खरं तर या फिचरला लोकांचा नकारात्मक प्रतिसाद जास्त लाभला होता. हे फिचर आल्यापासूनच काही तासांतच ते काढून टाकण्यासाठी युजर्सने मागणी केली होती. त्यानंतर व्हॉट्स अॅपने जुने स्टेटस फिचर परत आणणार असल्याचे सांगितले. अँड्राईड बिटा व्हर्जन २.१७. ९५ वर व्हॉट्स अॅप स्टेटसचे जुने फिचर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पूर्वीसारखेच व्हॉट्सअॅप युजर ‘Available’, ‘Busy’ यासारखे स्टेटस ठेवू शकतात. पूर्वीसारखे आपले स्टेटस ते कस्टमाईजही करू शकतात. जुन्या स्टेटसाठी एक वेगळा आयकॉन दिला जाणार आहे. पण याचबरोबर नवे फिचरही तसेच राहणार आहे. या फिचरचा वापर करून युजर्स पूर्वीसारखे फोटो, व्हिडिओ, जीआयएफ इमेज शेअर करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Viral Video : माझ्या आईला कोणी परत आणेल का?

गेल्यामहिन्यात व्हॉटसअॅपने ‘व्हॉट्सअॅप स्टेटस’ हे फिचर आणले होते. पण या स्टेटसची भुरळ मात्र लोकांना पडली नाही. हे फिचर व्हॉट्सअॅपवर नवे असले तरी इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटसारख्या अॅपवर हे फिचर आधीपासूनच होते. त्यामुळे व्हॉट्सअॅपने या फिचरची कॉपी केल्याचेही म्हटले जात होते. त्यामुळे जुने स्टेटस परत आणण्याचा निर्णय घेतला आहे हे कधी उपलब्ध होणार हे मात्र अजूनही स्पष्ट झाले नाही. व्हॉट्सअॅप स्टेटसच्या फिचरबरोबर आणखी दोन फिचर्स आणण्याच्या बेतात व्हॉट्सअॅप आहे. हे दोन फिचर्स आतापर्यंत फक्त अॅपलसाठी एक्सक्यूझीव्ह होते. आतापर्यंत अँड्राईडवर व्हॉट्सअॅप व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंगसाठी एकच बटण होते. त्या चिन्हावर क्लिक केले की व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉलचा पर्याय निवडता येतो. पण आता या दोन्ही पर्यायासाठी दोन वेगवेगळे आयकॉन असणार आहेत. वर उजव्या बाजूला हा पर्याय उपलब्ध असणार आहे.तर अटॅचमेंट आयकॉनची जागाही बदलणार आहे. फाईल अटॅचमेंटचा पर्याय कॉलिंग आयकॉनच्या नंतर होता. आता हा पर्याय टायपिंग बॉक्सच्या बाजूला येणार आहे. म्हणजे जिथे कॅमेराचा आयकॉन आहे त्याच्या बाजूला हा पर्याय देखील येणार आहे. कंपनीने हा बॉटम बार रिडिझाइन केला आहे, त्यामुळे तोही वेगळ्या स्वरूपात पाहायाला मिळणार आहे.