दिव्यांग व्यक्तीचे आयुष्य आपल्या जीवनापेक्षा खूप वेगळे असते. त्यांना अनेक गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. तर सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात दिव्यांग व्यक्तींना कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे सांगण्यात आले आहे. बंगळुरूच्या एका महिलेने स्वतःसाठी घर शोधताना व्हीलचेअरचा उपयोग करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या घरी किंवा इमारतीत कोणत्या सुविधा असाव्यात हे पोस्टमध्ये सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणीला जेव्हा काही आठवड्यांपूर्वी तिच्या घरमालकाने कळवले की, जिथे ते राहतात ते अपार्टमेंट त्यांना रिकामे करायचे आहे. तेव्हा तरुणी बंगळुरूमध्ये रहायला गेली. सहा वर्ष आधी, तिच्या नोकरीचे ठिकाण एका कॅम्पसमध्ये होते, ज्यामध्ये राहण्याची सोय, मॉल, दवाखाना, शाळा इत्यादी सर्व गोष्टी होत्या. पण, या सर्व गोष्टींमुळे आजूबाजूच्या इतर इमारतींपेक्षा तिला इथे जास्त भाड देऊन तडजोड करावी लागली. तसेच व्हीलचेअरचा वापर करत असल्यामुळे कामाला रस्त्यावरून व्हीलचेअर घेऊन जाणे किंवा कॅबमध्ये व्हीलचेअर ठेवून प्रवास करणे शक्य नसते; असे तिने सांगितले आहे.

हेही वाचा…मुंबईतील महिलेने १०० कोटींची मालमत्ता भावंडांच्या नकळत विकली! चाळीतील भाडेकरू व विकासकालाही चुना

पोस्ट नक्की बघा :

घर शोधताना करावा लागला समस्यांचा सामना :

तर घर खाली केल्यानंतर व्हीलचेअर प्रवेशयोग्य अपार्टमेंट (wheelchair accessible apartment) आणि घर शोधणे तरुणीसाठी खूप कठीण गेले. तरुणीच्या व्हीलचेअरचे वजन १३० किलो आहे आणि तरुणी व्हीलचेअरवर बसलेली असताना त्याच्यासोबत तिला उचलणे शक्य होत नाही. पायऱ्या नसलेला किंवा उतार परिसर असेल तर तरुणी तेथून सहज जाऊ शकते असे तिचे म्हणणे आहे. तसेच तरुणी पुढे म्हणतेय की, भारताच्या अनेक बाथरूमचे दरवाजे छोटे आहेत. तरुणी तिच्या व्हीलचेअरवर बसूनच अंघोळ करते. त्यामुळे अंघोळ करण्यासाठी जर व्हीलचेअर आतमध्ये घेऊन जायची असेल, तर बाथरूम किमान २५ इंच रुंद तरी असावी. काही बाथरूममध्ये प्रवेश करताच वॉश बेसिन किंवा काहींमध्ये कमोड असते, जे दरवाजा उडवून ठेवतात. तर काही बाथरूममध्ये दाराच्या बाहेर एक वॉर्डरोब असते, ज्यामुळे तरुणीला आतमध्ये जाणे कठीण होते. काही इमारतींमध्ये लिफ्ट इतकी लहान असते की, त्यात तरुणीला तिची व्हीलचेअर आणि तिचा केअरटेकर एकत्र येऊ शकत नाहीत, अशा अनेक समस्या तिने या पोस्टमध्ये सांगितल्या आहेत.

तसेच भारतात व्हीलचेअर प्रवेशयोग्य अपार्टमेंट खूपच कमी आहेत अशी खंत तिने व्यक्त केली आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
या तरुणीचे नाव मृण्मयी असे आहे आणि तिने आपल्या @mrunmaeiy या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.