उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन तरुण भररस्त्यात एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. शिवाय ते यावेळी एकमेकांना मारहाणही करत आहेत. खरं तर आजकाल रस्त्यांवर भांडणं होणं सामान्य झालं आहे. पण या दोन तरुणांचा व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे ते केवळ पाणीपुरीसाठी एकमेकांना मारहाण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुकानदाराने एका तरुणाला जास्त पाणीपुरी दिल्या नाहीत म्हणून त्यांने दुकानदाराला मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे.
दहा रुपयांत ७ पाणीपुरी न मिळाल्याने हाणामारी –
वृत्तानुसार, पाणीपुरी विकणाऱ्याने दहा रुपयांत सात पाणीपुरी देण्यास नकार दिल्यामुळे एक तरुणा रागवला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर दुकानदार आणि तरुणामध्ये जोरदार भांडण सुरू झाले. व्हायरल व्हिडीओमध्ये दोघेही रस्त्यावर फिल्मी स्टाईलमध्ये भांडताना दिसत आहेत. तर ही घटना अकील परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची हमीरपूर पोलिसांनी दखल घेतली आहे. त्यांनी सांगितलं की, कोतवाली सदर पोलिस स्टेशनमध्ये या संदर्भात कोणतीही माहिती किंवा तक्रार आलेली नाही. मात्र, व्हायरल व्हिडिओची दखल घेण्यात आली असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून कायदेशीर कारवाई केली जाईल.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रभात नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिलं, “हे देशाचे दुर्दैव आहे की लोक ३ रुपयांच्या पाणीपुरीसाठी भांडत आहेत.” तर आणखी एकाने लिहिलं, “दुकानदाराने आणखी २ पाणीपुरी दिली असती तर… भांडण्याचं कारण काय?” तर तिसऱ्या लिहिलं, “भाऊ, आपण कोणत्या युगात जगत आहोत? एका पाणीपुरीसाठी एवढ्या भांडणाची कल्पना करा?” @AlviMeraz ने लिहिलं, “दुःखाची गोष्ट म्हणजे ही भांडण सोडवण्याऐवजी लोक फक्त व्हिडिओ बनवत आहेत.”