सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडीओ इतके जबरदस्त असतात की ते पाहिल्यावर आपले मन प्रसन्न होते. त्याचबरोबर असे काही व्हिडीओ देखील आहेत, ज्यांना पाहून आपले डोळे पाणावतात. सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, या व्हिडीओतील मांजरीने जे केलं ते पाहून तुम्हाला हसू येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीव्हीवर पक्षी पाहून मांजर मारते उडी

व्हिडीओमध्ये हॉलमध्ये टीव्ही लावलेला दिसतो. या टीव्हीमध्ये एक चॅनल सुरू आहे, ज्यामध्ये पक्ष्यांशी संबंधित एक कार्यक्रम सुरु आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही हे देखील पाहू शकता की खोलीत बेडवर कुत्रा आणि मांजर बसले आहेत. दोघेही खूप काळजीपूर्वक टीव्ही पाहताना दिसत आहेत.

( हे ही वाचा: Viral: लग्नाआधी वराला धु-धु धुतला; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल एकदम बरोबर केलं)

कुत्र्यासोबत आरामात बसून टीव्ही पाहत असताना मांजरीला ते काय आहे हेच कळत नाही, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर ती अचानक टीव्हीवर दिसणाऱ्या पक्ष्यावर तीउडी मारते. वास्तविक, मांजर त्या पक्ष्याची शिकार करण्यासाठी त्याच्यावर उडी मारते. जे घडते ते पाहिल्यानंतर तुम्ही हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

( हे ही वाचा: ‘या’ तारखांना जन्मलेल्या लोकांना मिळते लवकर यश, त्यांच्यावर असतो धन देवता कुबेरचा आशीर्वाद )

कुत्र्याला बसतो धक्का

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की टीव्हीवर उडी मारल्यानंतर मांजर मोठ्या ताकदीने जमिनीवर पडते. हे पाहून तिथे बसलेल्या कुत्र्यालाही धक्का बसला. कुत्राही मनात विचार करू लागतो की मांजराला हे का काय झालं? हा मजेदार व्हिडीओ ट्विटरवर @buitengebieden_ नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. जिथून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

( हे ही वाचा: देसी जुगाड! शेतकऱ्याने भंगारातून बनवली अशी गाडी की त्यापुढे मोठे इंजीनियरही होतील फेल; बघा Viral Video)

( हे ही वाचा: Viral Video: नवरी घोडीवरून नवरदेवाच्या घरी पोहोचली; केला जबरदस्त डान्स)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. खरं तर, हा संपूर्ण प्रसंग खूपच विनोदी वाटतो. त्यामुळे लोक व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटीझन्स अनेक कमेंट करत आहेत. व्हिडीओ पाहून एका यूजरने लिहिले की, ‘म्हणूनच माझी मांजर टॅबलेटवर पाहते.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When a cat sees a bird on tv it jumps for the hunter and watch viral video ttg