Father-Dughter video: मुली या’पापा की परी’ म्हणजेच ‘बाबांची राजकन्या’ असतात. मुली आणि वडिलांचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असतं. मुलांचा कायम मला एक मुलगी हवी असा सूर असतो. त्या चिमुकलीला हात घेतल्यापासून त्यांचा एक ऋणानुबंध निर्माण होतं. वडील सतत तिच्यावर प्रेमरुपी सावली घेऊन वावर असतो. मोठेपणे वडिलांसारखाच जोडीदार हवा अशी मुलींची इच्छा असते. या अशा सुंदर नात्यामुळे की काय आजही मदर्स डे पेक्षा फादर्स डे जास्त उत्साहात साजरा होतो. अशाच एका वडिलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, यामध्ये आपल्या मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदा तिच्या रडण्याचा आवाज ऐकून वडिल खूप भावूक झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाप-लेकीचं नातं काही स्पेशल असंत. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर.बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो, लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो. लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो आणि प्रसंगी बाबाचा धाकही असतोच. म्हणूनच म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही. यावेळी जेव्हा एक तरुण मुलीचा बाप होतो तेव्हा त्याचा आनंद तो शब्दात व्यक्त करू शकत नाही हेच या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण हॉस्पिटलमध्ये बसला आहे. त्याची बायको बाळाला जन्म देण्यासाठी ऑपरेशन रूममध्ये गेली आहे. यावेळी सर्व नातेवाईक बाहेर बसलेले आहेत. अशातच अचानक रुममधून बाळाचा रडण्याचा आवाज येतो आणि पहिल्यांदाच बाप झालेला तरुण धायमोकलून रडू लागतो. यावेळी कठोर काळजाचा असणाऱ्या बापाचं हळवं मन पाहायला मिळालं. मुलगी झाली हे कळताच त्याला त्याचे अश्रू अनावर झाले.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ the_ultimate_trolls_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ज्या लेकीला लहानाची मोठी केली, तिला परक्याच्या घरी पाठविताना आई-वडिलांच्याही काळजाला काय वाटत असेल हे कुणीच नाही सांगू शकत.