Elephant Viral Video : जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी असलेल्या हत्तीला सर्वात समजदारही मानलं जातं. हत्ती इतर प्राण्यांच्या तुलनेत अतिशय शांत, समजूतदार समजला जातो. जंगलात आपल्या कळपासोबत राहणं तो पसंत करतो, जेणेकरुन तो सुरक्षित राहू शकेल. शांत असला, तरी हत्तीला रागही येतो, अनेकांच्या याबाबतच्या घटना तुम्ही ऐकल्याही असतील. जंगलात राहणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये हत्ती हा सर्वात बुद्धिमान आणि शक्तिशाली प्राणी मानला जातो. त्याच्या ताकदीपुढे इतर प्राणी फार काळ टिकू शकत नाहीत. हत्ती हे शांतताप्रिय असले तरी त्यांना कोणी छेडले तर ते त्यांना सोडत नाहीत. असाच एका हत्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये दिसतंय की, खुल्या मैदानात एक भलीमोठी क्रेन उभी असलेली दिसून येत आहे. या क्रेनसमोर अचानक एक हत्ती समोर येतो. हा हत्ती या भल्यामोठ्या क्रेनशी भिडताना दिसून येतोय. आपल्या अंगातली सर्व ताकद एकत्र करून डोक्याने या क्रेनला धक्का देताना दिसून येतोय. बराच वेळ तो या क्रेनशी भिडत असतो, पण तरी सुद्धा हा हत्ती या क्रेनला जागचं हलवू शकला नाही. शेवटी या क्रेनसमोर हार मानत हा हत्ती तिथून निघून जाण्यातच धन्यता मानतो. हा व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेतोय.
आणखी वाचा : अशी कॉपी कोण करतं? विद्यार्थ्याचा जुगाड पाहून शिक्षकही झाले हैराण
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : प्रेमासाठी काय पण! सुटकेसमध्ये गर्लफ्रेंडला टाकून होस्टेलबाहेर घेऊन जात होता, पाहा हा VIRAL VIDEO
wild_animals_creation नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ‘हत्ती विरूद्ध जेसीबी मशीन’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ तिथल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला.
आणखी वाचा : बापरे! अचानक हवेत उडू लागला हा व्यक्ती आणि समुद्रावर घिरट्या घालू लागला, पाहा VIRAL VIDEO
लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडू लागलाय. प्रत्येकजण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वेगवेगळे भन्नाट कमेंट्स शेअर करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ जितका मजेदार आहे, त्याहूनही या व्हिडीओवरील कमेंट्स देखील मजेदार आहेत.