सोशल मिडीयावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. काहीवेळा सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी हास्यास्पद असतात, तर काही प्रकरणे आश्चर्यकारक असतात. त्याचबरोबर काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात, जे पुन्हा पुन्हा पहावे असे वाटतात आणि लोकांची मनेही जिंकतात. यावेळी असाच एक छोट्या मुलीचा गोंडस व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे , ज्यामध्ये ती लहान मुलगी आपल्या शिक्षकाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत असून लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मुलीचा हा व्हिडीओ बघून तुम्ही देखील भावूक व्हाल.

अनेकवेळा मुलं आपल्या निरागसतेने असं काही करतात, ज्याकडे संपूर्ण जग पाहत राहतं आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास ठेवणे कठीण जातं. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी पीएम मोदींसोबत ‘मन की बात’ करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी पहिल्यांदा पंतप्रधान मोदींच्या तब्येतीबद्दल विचारते. मग ती तिचं नाव सांगते. यानंतर मुलगी तिची ‘मन की बात’ मोदींना सांगते. तिने ज्या पद्धतीने पीएम मोदींकडे तक्रार केली आणि ती सोडवायला सांगितली, यामुळे तिने अनेक लोकांची मने जिंकली आहेत. अनेकजण हा व्हिडीओ पाहून भावूक देखील झाले आहेत.

( हे ही वाचा: Viral Video: हत्ती ट्रक थांबवून करवसुली करतात का? वनाधिकाऱ्यानं विचारला मजेशीर प्रश्न)

( हे ही वाचा: VIRAL VIDEO : वैमानिक मुलानं पालकांना दिलं भन्नाट सप्राईज; हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल त्याचं कौतुक)

नेटीझन्सची प्रतिक्रिया

गोंडस मुलीचा हा व्हिडीओ ट्विटरवर ‘@kumarayush084’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. १ मिनिट १३ सेकंदाचा हा व्हिडीओ असून आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याच वेळी, सुमारे ६०० लोकांनी व्हिडीओला लाइक केले आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओवर लोक एकाहून एक मजेशीर प्रतिक्रिया देखील देत आहेत. एकाने म्हटलंय की पीएम मोदींनी मुलीच्या शब्दांचा विचार केला पाहिजे. तर दुसऱ्या व्यक्तीने प्रतिक्रिया दिलीय की आजकाल शाळेच्या दप्तरांचे वजन मुलांपेक्षा जास्त आहे.

Story img Loader