सोशल मीडियावर अनेकदा जंगलातील प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी प्राण्यांच्या गमती जमती सुरू असतात, तर कधी प्राण्यांची भांडणं आपल्याला पाहायला मिळतात. वाघ हा जंगलातील अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. कारण तो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं हल्ला करतो. आधी तो आपली शिकार निवडतो अन् मग शांतपणे तो प्राणी टप्प्यात येण्याची वाट पाहतो अन् एकदा का संधी मिळाली की मग पूर्ण ताकतीनिशी तो हल्ला चढवतो. बरं, हा हल्ला इतका जोरदार असतो की, समोरच्या प्राण्याला प्रतिकार करण्याचीदेखील संधी मिळत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाघ आपल्या शिकारीला क्रूरपणे मारतो. शिकार कितीही मोठी असली तरी वाघाच्या तावडीतून सुटणे अवघड असते. मात्र, सोशल मीडियावर कधी कधी वेगळेच दृश्य पाहायला मिळते. कधी कुत्रा भुंकून सिंहाला पळवून लावतो, तर कधी म्हैस सिंहांना मारून टाकते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्हिडीओमध्ये वाघासमोर दोन शेळ्या येतात, त्यापैकी एक शेळी वाघावर शिंगाने हल्ला करू लागते.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नौमान हसन (Nouman Hassan) ने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नौमानने आपल्या घरात अनेक प्राणी ठेवले आहेत, ज्यात चित्ता ते सिंह यांचा समावेश आहे. हे असे प्राणी आहेत जे सर्वात धोकादायक मानले जातात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नौमानने दोरीने बांधलेले वाघाचे पिल्लू धरले आहे, तर दुसऱ्या हातात दोन बकऱ्या आहेत. जेव्हा काळी बकरी वाघाला भेटते तेव्हा वाघ त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंतर शेळी आपल्या शिंगांनी हल्ला करू लागते. वाघ घाबरतो आणि मागे हटतो.

(हे ही वाचा : हा तर निर्लज्जपणाचा कळस! धावत्या ट्रेनमध्ये कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की..; VIDEO व्हायरल )

वाघाचे पिल्लू पुन्हा शेळीकडे सरकते, तसे शेळी आपल्या शिंगांनी जोरदार हल्ला करते. अशा स्थितीत वाघ माघार घेतो आणि शांतपणे जमिनीवर पडून राहतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वाघाचे हे पिल्लू शेळीशी लढण्याच्या मूडमध्ये नाही, असे वाटते. वाघ बसताच शेळीही शांतपणे उभी राहते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे, तर हजारो लोकांनी त्याला लाईक आणि शेअर केले आहे. शेकडो कमेंट्सही आल्या आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, “हा वाघ दुपारच्या जेवणाच्या वेळी नाश्ता करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये.” अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When a tiger and a goat came face to face videos of viral in social media pdb