Viral Video : पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असते. दोन व्यक्ती एकत्र येतात आणि आयु्ष्यभर एकमेकांना सहकार्य करतात. लग्नानंतर काही वर्षांनी मुलं बाळ आणि संसारात गुंतल्यावर एकमेकांविषयी प्रेम असून त्यांना प्रेम व्यक्त करता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेव्हा काकू काकांना फोनवर ‘आय लव्ह यू’ म्हणतात, तेव्हा काकांची जी प्रतिक्रिया येते ते ऐकून तुम्हाला हसू येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात अनेक महिलासुद्धा उपस्थित आहे. या व्हिडीओमध्ये अँकर काकूंना त्यांच्या पतीला फोन लावायला सांगतात. काका फोन उचलतात तेव्हा काकू काकांचे फोनवरील संभाषण ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल.

काकू : हॅलो
काका : हॅलो
काकू : काय करत आहात?
काका : बोल आता काय काम होतं?
( काकू सह कार्यक्रमातील सर्व जण हसतात)
काका : बोल की
काकू : माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
काका : काय झालं?
(सर्व जण हसतात)
काकू : माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.
काका : हाय तर मग बोल की मग
काकू : आय लव्ह यू
काका : आता काय हे वय आहे का आय लव्ह यू म्हणायचं?
काका : बरं काही काम आहे का आता?
काकू : नाही
काका : बरं आय लव्ह यू टू

काका काकूंचा फोनवरील संवाद ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. कार्यक्रमातील महिला पोट धरून हसताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : खेळ जीवन-मृत्यूचा! जीव वाचवण्यासाठी माकडाने लढवली शक्कल, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहिला बिबट्या, पाहा Viral Video

पाहा व्हायरल व्हिडीओ

sushilsuryawanshi05 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अचानक केला नवऱ्याला कॉल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिलेय, “आमचा नवरा म्हणेल आज काय डोक्यावर पडली की काय नाहीतर म्हणेल आज तर लयच प्रेम उतू चाललंय” तर एका युजरने लिहिलेय, “आजकालच्या धरसोडवाल्या पिढीला हे प्रेम नाही कळणार!” आणखी एका युजरने लिहिलेय, “नवरा बायको म्हणजे…. प्रेम काळजी जबाबदारी कर्तव्य विश्वास या सर्वांच मिश्रण.. ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.