Viral Video : भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सण, उत्सव, शुभप्रसंगी, पूजा किंवा नियमित अंगणात दारासमोर रांगोळी काढली जाते.सुशोभीकरणासाठी काढली जाणारी रांगोळी ही महिलांमध्ये लोकप्रिय आहे. सहसा आपल्या देशात महिला खूप सुरेख रांगोळी काढतात. याशिवाय काही पुरुषांनाही रांगोळी काढायला आवडते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रांगोळी संस्कृतीचाच भाग नसून स्पर्धेचा सुद्धा भाग आहे. शाळा, महाविद्यालय, सार्वजानिक उत्सव किंवा कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाते. अशा स्पर्धांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलाने एक भन्नाट रांगोळी काढली आहे. रांगोळी पाहून तुम्ही डोके धराल.

हा व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील रांगोळी स्पर्धेचा आहे. या व्हिडीओत अनेक शाळकरी मुली सुरेख रांगोळी काढताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत एक मुलगा रांगोळी काढताना दिसतो. त्याची रांगोळी पाहून तु्म्हाला पोट धरुन हसायला येईल. त्याने काळी जादूची रांगोळी काढली आहे. या रांगोळीत त्याने कापूर सुद्धा जाळला आहे. हा मजेशीर व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा : Viral Video : बहिणीला ‘कचरा’ म्हणत भावांनी केला ‘गाडी वाला आया हे घर से कचरा निकाल’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा लग्नातील मजेशीर व्हिडीओ

prashant_sen07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्पर्धा जिंकण्यासाठी मुलाने काळी जादूची रांगोळी काढली.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला शिक्षकांची प्रतिक्रिया पाहायची?” तर एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “फक्त मंत्राचा जाप करायचा?” आणखी एका युजरने लिहिलेय,”फक्त इतका आत्मविश्वास असायला पाहिजे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When boys draw rangoli a school boy draw unbelievable rangoli that we cannot control laughing video viral on social media ndj