Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला हसवतात; तर काही व्हिडीओ खूप काही मोलाचा संदेश देऊन जातात. त्यापैकी काही व्हिडीओ असे असतात की, जे पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे का? पण, काही व्हिडीओंतून खऱ्या माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. एकसारख्या व्यवसायातील आपला स्पर्धक हा अनेकदा शत्रूच्या रांगेत असलेला दिसतो. कारण- दोघांचेही लक्ष्य असलेला ग्राहकवर्ग हा एकच असतो. त्यामुळे हे दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात. अशाच दोन प्रतिस्पर्ध्यांचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. मात्र, यावेळी कोणतीही स्पर्धा होण्याऐवजी तर माणुसकीचे दर्शन घडलेय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

परस्परांचे स्पर्धक झाले परस्परांचे मित्र

हातात स्मार्टफोन आल्यापासून जवळपास प्रत्येक जण काहीसा स्मार्ट झाला आहे. हातातील मोबाईलच्या कॅमेऱ्याचा वापर करून प्रत्येक नागरिक काही ना काही हटके फोटो, व्हिडीओ टिपत असतो. पुण्यातही असेच काहीसे घडले. @punekarnews नावाच्या एका एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. त्यामध्ये पाहायला मिळते की, स्विगी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला झोमॅटो कंपनीचा डिलीव्हरी बॉय धक्का देतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तसे पाहायला गेले, तर झोमॅटो आणि स्विगी हे परस्परांचे स्पर्धक. पण, व्यवसायात स्पर्धा असली तरी डिलिव्हरी बॉय हे परस्परांचे मित्र असू शकतात. त्यामुळे अडचणींच्या वेळी हे डिलिव्हरी बॉय परस्परांचे कॉम्रेड बनतात आणि मग मदत करताना कोणतीही कसूर ठेवत नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ असेच काहीसे सांगत आहे.

माणुसकीचं दर्शन

सध्याच्या जगात माणुसकी हरवली जात असल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. संकटाच्या वेळी माणसाला मदत करावी. वेळ पडली, तर आपण दोन घास कमी खावे; पण भुकेलेल्याच्या मुखी घास जायला हवा, असे अनेकांना लहानपणापासून शिकवले जाते. पण, आपण किती जण त्याचे पालन करतो, असा प्रश्न आहे. पण, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये व्यक्तीने जे काही केले, ती खरी माणुसकी आहे, असे म्हणायला हरकत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Photo: “तुम्ही ज्या शरीराच्या जीवावर पैसा कमवता…” अशी पाटी जी विचार करायला नक्की भाग पाडले; पाहा तुम्हीही यातलेच आहात का?

हा व्हिडीओ एक्सवर @punekarnews नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “माणुसकी अजूनही जिवंत आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “खूप सुंदर! हे फक्त पुण्यातच होऊ शकतं.”