एखादी नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर आनंद गगनात मावेनासा असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसेल की, एका शेतकऱ्याच्या घरी नवीन लॅपटॉप आणला आहे. नवीन लॅपटॉप आणल्यानंतर शेतकरी मनोभावे त्या लॅपटॉपची पूजा करताना व्हिडीओत दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखादी नवीन वस्तू घरी आणल्यानंतर आपण त्या वस्तूची पूजा करतो, ही आपली भारतीय संस्कृती आहे. हीच परंपरा जपताना शेतकरी या व्हिडीओतून दिसत आहे.
हल्ली लॅपटॉप किंवा फोनची कुणीही पूजा करताना दिसत नाही; पण साध्याभोळ्या शेतकऱ्याच्या घरी जेव्हा लॅपटॉप येतो तेव्हा त्या नव्या वस्तूची तो कशी पूजा करतो, हे या व्हिडीओतून दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा : देवकुंड धबधब्याजवळच्या वाहत्या झऱ्यात अडकलेल्या कुत्र्याचा तरुणाने वाचविला जीव; नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, शेतकरी जमिनीवर बसलेला दिसत आहे. पुढे शेतकरी नवीन लॅपटॉप पाटावर ठेवतो. शेतकरी त्या लॅपटॉवर हळदकुंकू, अक्षता टाकतो, फूल ठेवतो. पाटाच्या बाजूला अगरबत्ती लावतो. एवढंच काय तर लॅपटॉपसमोर नारळ सुद्धा फोडतो. पूजा पूर्ण झाल्यानंतर हळूच लॅपटॉप सुरू करतो. या शेतकऱ्याच्या बाजूला एक चिमुकलाही बसलेला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

_amol.taur_04 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “जेव्हा शेतकऱ्याच्या घरी लॅपटॉप येतो..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “ही आपली मराठी संस्कृती आहे” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “आपली संस्कृती जपणे, हे आपले कर्तव्य आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझ्या नवीन लॅपटॉपची आईने सुद्धा अशीच पूजा केली होती”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When farmer buy a new laptop worship video of indian culture goes viral ndj
Show comments