Viral Video : सोशल मीडियावर तरुण मुले त्यांच्या अकाउंटवरून त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी शेअर करत असतात. कधी त्यांच्या घरातील लोकांचे व्हिडीओ शेअर करतात तर कधी त्यांच्या जीवनातील मजेदार किस्से शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका तरुणीने तिच्या आजोबांचा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे आजोबा तिच्या आजीला डार्लिंग म्हणताना दिसतात. जेव्हा आजोबा आजीला डार्लिंग म्हणतात, तेव्हा नेमकं काय घडते? हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसणार. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

जेव्हा आजोबा आजीला सर्वांसमोर डार्लिंग म्हणतात…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक जोडपे (कदाचित मुलगा आणि सून असावे) दुचाकीवरून जात असतात. तेव्हा त्यांच्या दुचाकीजवळ आजी आणि तिचा नातू उभा असतो. तितक्यात आजोबा तिथे येतात आणि आजीला डार्लिंग म्हणून हाक मारतात. आजोबांनी डार्लिंग म्हणतातच नातू आणि दुचाकीवरील जोडपे जोरजोराने हसताना दिसतात. तेव्हा आजी आजोबांना म्हणते, “शांत बसा” त्यावर नातू म्हणतो, “पुन्हा एकदा म्हणा” त्यावर आजोबा म्हणतात, “नाही”. हा व्हिडीओ पाहून कोणालाही हसू येईल. काही लोकांना त्यांच्या आजी आजोबांची आठवण येईल.

पती पत्नीचे नाते हे जगावेगळे असते. वयानुसार या नात्यात आणखी प्रेम वाढत जाते. या व्हिडीओमध्ये सुद्धा तुम्हाला आजी आजोबांचे एकमेकांवरील प्रेम दिसून येईल.

हेही वाचा : बसमधली मोफत सीट कुणाची? दोन बायकांमधील दे दणादण हाणामारी पाहून WWE विसरुन जाल; एकमेकींच्या उपटल्या झिंज्या अन्…

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : वृद्ध आई वडिलांना फक्त तुमचा वेळ हवा असतो! “मला काहीही नको फक्त तू पाहिजे” आजोबा लेकीचा संवाद व्हायरल, पाहा ह्रदयस्पर्शी VIDEO

prachi.chugh_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या डार्लिंगला दोन मिलिअन व्ह्युज मिळाले.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मैं शब्द, तुम अर्थ
तुम बिन, मैं व्यर्थ।” तर एका युजरने लिहिलेय, “आजीला कुठे माहितेय की ती किती नशीबवान आहे. आजकालच्या मुलींना विचारा असे प्रेम करणारे किती नशीबाने भेटतात.” तर एका युजरने लिहिलेय, “चुकून आजोबाच्या तोंडातून निघाले” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी आजोबांचे कौतुक केले आहेत.