Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2023: मुंबईतील लालबाग, चिंचपोकळी हा भाग गणेश भक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी याठिकाणी लाखो गणेशभक्त आपल्या लाडक्याचं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहचत असतो. दरम्यान तरूणाईचं खास आकर्षण असलेल्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. अलोट भक्तांच्या गर्दीमध्ये हा गणपती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. चिंतामणीचं प्रथम दर्शन आणि आगमन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंची गर्दी असते. मंडळाकडून गणपतीची भव्य मूर्ती मंडपामध्ये विराजमान होणार आहे. यंदा चिंतामणीच्या गणेशाची मुर्ती हटके असणार आहेच आणि मंडप देखील भव्य दिव्य असा सजवण्यात आला आहे.

आगमन सोहळ्याची तारीख जाहीर

Ramdas Athawale On Saif Ali Khan Attack
Ramdas Athawale : “मुंबई पोलिसांना सक्त सूचना…”, सैफ अली खानवरील हल्ल्याच्या घटनेवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suresh Dhas On Dhananjay Munde
Maharashtra News Updates : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, “राजीनामा घेणं…”
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Manoj Jarange Patil on Dhananjay Munde
Maharashtra News : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करत आक्रोश मोर्चा, मनोज जरांगेही सहभागी

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचं हे १०४ वे वर्ष आहे. चिंचपोकळीतील चिंतामणी मंडळ म्हणजे, मुंबईतील जुन्या मंडळांपैकी एक आहे. सर्वच भक्तांना चिंतामणीच्या आता आगम सोहळ्याचं वेध लागले आहेत, गणेशभक्त वर्षभर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतात, अशातच चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याची तारीख मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. ९ सप्टेंबर शनिवारी हा आगमन सोहळा पार पडणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित असते, अशावेळा कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी आपले पोलीस बांधव नेहमीच तत्पर असतात. यावेळीही मुंबई पोलीस दलातर्फे ०९ सप्टेंबर २०२३ रोजी होण्याऱ्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याविषयी चिंतामणी भक्तांना आवाहन केले आहे.

पोलिसांनी केलं आवाहन

पोलिसांनी भक्तांना मौल्यवान वस्तू न बाळगण्याचं आवाहन केलं आहे, तसेच गर्दीमध्ये काही संशयीत वस्तू मिळाली तर पोलिसांशी संपर्क साधा, आफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच काहीही अडचण आली तरी पोलिसांना संपर्क करा. असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बापरे! अशी दहीहंडी कधीच पाहिली नसेल, मडकं धरून बाल्कनित होता उभा, तेवढ्यात गेला तोल, अन्…

चिंचपोकळीच्या चिंतामणी उत्सव मंडळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

सन १९४४ साली मंडळाचे रौप्य महोत्सव साजरे झाले. १९५६ साली मंडळाची घटना तयार करण्यात आली. त्यामध्ये ‘चिंचपोकळी गणेशोत्सव’ हे नाव बदलून चिंचपोकळी उत्सव मंडळ असे नामकरण करण्यात आले. गणेशोत्सव मंडळ हे वर्षातील मर्यादित कालावधीसाठी असते पण मंडळाच्या समाजकार्याचा कालावधी मर्यादित नव्हता. सामाजिक क्षेत्रात वर्षभर कार्यरत व्हावे या हेतूने हे नामकरण करण्यात आले. १९२० साली स्वातंत्र्य हेच ध्येय या प्रेरणेने तरुण भारावलेले होते. समाज प्रबोधन आणि लोक शिक्षणाचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्याकाळी उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली होती. १९६८-६९ साली सुवर्ण महोत्सव, १९७९ साली-८० साली हिरक महोत्सव तर १९९४-९५ साली ७५ वे वर्षे साजरे करण्यात आले.

Story img Loader