उरामंदीं माया त्याच्या, काळ्या मेघावानी
दाखविना कधी कुना, डोळ्यातलं पाणीझिजू झिजू संसाराचा गाडा हाकला ,
व्हटामंदी हासू जरी कना वाकलाघडीभर तू थांब जरा ऎक त्याची धाप रं
लई अवघड हाय र गड्या उमगाया बाप रंउमगाया बाप रं !
Fathers Day 2024 Wishes Quotes: खरंच या गाण्याच्या ओळी आपल्या आयुष्यातील बापमाणसाचं योगदान किती अचूक शब्दात मांडतात नाही का? कधीच कुठल्याच अपेक्षा न ठेवताना, जबाबदारीचं ओझं उचलणारा बाबा, आपल्या फक्त जवळ असला तरी केवढा आधार वाटतो हे तुम्हालाही माहित असेल. दुर्दैव म्हणजे प्रचंड कष्ट घेऊन, त्याग करून सुद्धा आईच्या वाट्याला येणारा मुलांच्या मनातील हळवेपणा बाबाच्या वाट्याला फार कमी वेळा येतो. वडिलांच्या बाजूला उभं राहणं, त्यांना मिठी मारणं हे अजूनही कित्येक जणांचं स्वप्न आहे. दुर्दैवाने म्हणा किंवा आदरयुक्त भीतीने म्हणा ते स्वप्न अनेकदा अनकेनच्या आयुष्यात पूर्णच होत नाही. आता जग बदलत असताना नात्यांची हीच परिभाषा आपण बदलायला हवी, बाबांना सुद्धा एकदा प्रेमाने मिठी मारायला हवी. त्यासाठी चांगला मुहूर्त सुद्धा आता जवळ आला आहे. येत्या रविवारी म्हणजेच १६ जूनला फादर्स डे साजरा केला जाणार आहे. हेच निमित्त साधून तुम्ही तुमच्या वडिलांना शुभेच्छा देण्यापासून या दिवसाची सुरुवात करू शकता.
फादर्स डे कधी असतो? (Father’s Day Date 2024)
१९१६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी फादर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता. त्यानंतर १९२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी फादर्स डे हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून घोषित केला, त्यानंतर १९६६ मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची घोषणा केली. यंदा भारतात १६ जूनला फादर्स डे साजरा केला जाईल.
फादर्स डे शुभेच्छा (Happy Father’s Day Wishes Marathi)
बाबा तुम्ही ग्रेट आहात,
तुमचे आभार!खिसा रिकामा असूनही कधी ‘नाही’ शब्द ऐकला नाही..
माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती पाहिला नाही..
हॅप्पी फादर्स डे…माझ्या प्रत्येक संकटाच्या वेळी एक हात नेहमी माझ्या खांद्यावर होता..
तो कोणी नाही.. माझा लढाऊ बाप होता…
हॅप्पी फादर्स डे!!!वडिलांसाठी काय स्टेटस ठेवावा..
त्यांच्यामुळेच आज माझं एक स्वत:चं आगळं वेगळं स्टेटस आहे..
हॅप्पी फादर्स डेभाग्यवान असतात ती लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
इच्छा पूर्ण होतात सर्व
जर वडील त्याच्याबरोबर असतात.
हॅप्पी फादर्स डे!हे ही वाचा<< पुणे: बाळाला कडेवर घेऊन बारटेंडिंग करणाऱ्या आईचा Video पाहून बसेल धक्का; चक्क साडी नेसून दाखवल्या करामती, पाहा
खरंतर आपले मराठी ‘वडील’ हे व्यक्त होण्याच्या बाबत अनेकदा बॅक फूटला असतात, त्यामुळे तुम्ही फार भाषण द्यायला गेलात तर कदाचित तेच ओशाळले जातील त्यापेक्षा अगदी मोजक्या शब्दात वर दिलेल्या शुभेच्छा Whatsapp स्टेटस, स्टोरी,च्या माध्यमातून शेअर करू शकता. आणि हो शक्य असेल तर बाबांना आवडता एखादा पदार्थ बनवा, बघा अगदी कमी कष्टात पण नक्की तुमचेही वडील खुश होतील.
Happy Father’s Day Wishes: ‘फादर्स डे’ची तारीख काय? ४ ओळीत बाबा खुश होतील अशा ‘या’ शुभेच्छा आजच सेव्ह करून ठेवा
Happy Fathers Day 2024 Wishes: खरंतर आपले मराठी 'वडील' हे व्यक्त होण्याच्या बाबत अनेकदा बॅक फूटला असतात, त्यामुळे तुम्ही फार भाषण द्यायला गेलात तर कदाचित तेच ओशाळले जातील त्यापेक्षा अगदी मोजक्या शब्दात खाली दिलेल्या शुभेच्छा शेअर करू शकता.
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
First published on: 11-06-2024 at 18:04 IST | © IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When is fathers day 2024 wishes messages quotes sms wallpaper in marathi also photos gif videos to share with your dad baba svs