Father Son Emotional Video : आईची माया सर्वांना दिसते, पण बापाचं प्रेम, काळजी मात्र कोणाला दिसत नाही. आई लेकराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते, पण त्याच लेकराला काही झालं तर जीव तोडून धावत रुग्णालयात नेणारा हा बाप असतो. मुलांचं पोट भरण्यासाठी रात्रांदिवस मेहनत करतो, त्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतो. बापाची माया दिसत नसली तरी त्याच्या प्रत्येक कृतीतून याची जाणीव होते. वडील आणि मुलाचं हेच नातं दर्शवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील एका रेल्वेस्थानकावरील या व्हिडीओत एक बाप जबाबदारी आणि कर्तव्य दोन्ही एकाच वेळी पार पाडताना दिसतोय.

मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आई-वडील दोघांची असते. पण, अनेकदा परिस्थितीमुळे जबाबदारी कशी पेलायची असा प्रश्न पडतो. एकीकडे पोट भरण्यासाठी काम करणं गरजेचं असतं, तर दुसरीकडे दोघं कामावर गेल्यावर मुलांना कोण सांभाळणार याची काळजी असते. पण, व्हिडीओमध्ये एक बाप दोन्ही जबाबदाऱ्या एकटाच पेलताना दिसतोय.

मुलाच्या काळजी पोटी बापाने काय केले पाहा!

मुंबईतील रेल्वेस्थानकांवर तुम्ही पाहिलं असेल, सध्या विविध प्रकारची बांधकामं सुरू आहेत. व्हिडीओमध्ये अशाच एका स्थानकावर एक बाप मोलमजुरी करतोय. यावेळी त्याच्या बाजूला एक लहान मूल बसलं आहे. घरी मुलाला सांभाळण्यासाठी कोणीही नव्हतं, त्यामुळे हा बाप मुलाला कामावर बरोबर घेऊन आला. यावेळी काम करतेवेळी मूल कुठे दूर जाऊ नये, खेळता-खेळता त्याला काही होऊ नये या काळजीपोटी बापाने मुलाचा पाय दोरीच्या साहाय्याने बांधून ती दोरी रेल्वेस्थानकाच्या खांबाला बांधून ठेवली आहे. यातून पोटासाठी लोकांना काय काय करावं लागतं याची जाणीव होते. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहे.

असा जीवघेणा डान्स तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल, तरुण टॉवरच्या रेलिंगवर उभे राहिले अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

जेव्हा प्रेम आणि कर्तव्य दोन्ही गोष्टी बापासमोर असतात, तेव्हा तो कशाप्रकारे त्या सांभाळतो याची जाणीव व्हिडीओ पाहिल्यानंतर होईल. त्यामुळे म्हटले जाते की, बाप समजणं ही खूप अवघड गोष्ट आहे. हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ @sam_safarnama_vlog’s नावाच्य अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्या वडिलांनी उपसलेल्या कष्टाची जाणीव होईल.

Story img Loader